Best Horror Movies list  Instagram
मनोरंजन

Best Horror Movies |''घरात एकटे असताना अजिबात पाहू नका हे हॉरर चित्रपट!”

Horror Films | “हे हॉरर चित्रपट एकटे असताना अजिबात पाहू नका!”

स्वालिया न. शिकलगार

हॉरर चित्रपट पाहणे हे भीतीदायक असतंच, पण त्यात जर आपण घरी एकटे असू तर मग काही सांगायचं नाही...उगाचचं भास होत राहतात की, कुणीतरी आपल्याला पाहतयं..आम्ही इथे काही हॉरर चित्रपटांविषयी माहिती देत आहोत, ज्यात थरार, थोडं गूढ आणि कुतूहलही आहे. जर तुम्ही हॉरर चित्रपटांचे शौकीन असाल, तर काही हॉरर चित्रपट इतके अंगावर येणारे आहेत की, एकटे पाहताना तुमचा थरकाप उडेल. काहींमध्ये मनोवैज्ञानिक थरार आहे, तर काहींमध्ये पारंपरिक भूतपटांचा रंजक ट्विस्ट. चला तर मग पाहूया असे ७ हॉरर चित्रपट, जे एकटे पाहणं म्हणजे धाडस!

Shaitaan 2

अजय देवगण – आर माधवन यांची ‘ब्लॅकमॅजिक’ ही संकल्पना अजून गडद आणि भीषण रूपात इथे परतली आहे. यातील बेस्ट सीन म्हणजे - मुलीचा आरशात दिसणारा चेहरा, जो अंगावर काटा आणणारा आहे.

The Exorcist

विलियम फ्राइडकिनच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारीत चित्रपट आहे. एका शाळकरी मुलीच्या शरीरात भूत असते. हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा ठरला होता. ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकित होणारा हा पहिला चित्रपट ठरला. रात्रीच्या वेळी तर हा चित्रपट अजिबात पाहू नका.

Hereditary

लेखक-दिग्दर्शक एरी एस्टरने एक डार्क फॅमिली हॉरर ड्रामा हेरेडिटरी आणला होता. २०१८ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. हेरेडिटरीची सुरुवात एनीच्या आईच्या मृत्यून होते.

The Conjuring

जेम्स वॅन यांना आधुनिक हॉरर चित्रपटांचे मास्टर्स मानले जाते. त्यांनी सॉ, डेड सायलेन्स, इंसिडियस सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. पॅट्रिक विल्सनने यामध्ये भूमिका साकारली होती. एड आणि लॉरेन वारेनच्या वास्तविक जीवनातील घटनांवर आधारित भयानक कहाणी आहे. दुर्गम र्‍होड आयलँडच्या घरात भयानक घटना यामध्ये दाखवण्यात आलीय.

The Haunting of Hill House

द हॉंटिंग ऑफ हिल हाऊस ही एक अमेरिकन अलौकिक भयपट नाटक टेलिव्हिजन लघु मालिका आहे जी माइक फ्लॅनागन यांनी तयार केली आहे आणि दिग्दर्शित केली आहे, जी नेटफ्लिक्ससाठी अम्बलिन टेलिव्हिजन आणि पॅरामाउंट टेलिव्हिजनने निर्मित केली आहे आणि द हॉंटिंग अँथॉलॉजी मालिकेतील पहिली एंट्री म्हणून काम करते. एक भावनिकदृष्ट्या विनाशकारी कौटुंबिक नाटक देखील आहे. हा नेटफ्लिक्सने आतापर्यंत प्रदर्शित केलेल्या सर्वोत्तम शोपैकी एक आहे.

The Purge

द पर्ज हा २०१३ चा अमेरिकन डायस्टोपियन अ‍ॅक्शन हॉरर चित्रपट आहे जो जेम्स डेमोनाको यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात एथन हॉक , लीना हेडी , अ‍ॅडलेड केन आणि मॅक्स बर्खोल्डर हे एका श्रीमंत कुटुंबातील सदस्यांच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाने ३ दशलक्ष डॉलर्सच्या बजेटच्या तुलनेत ९१ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली होती.

Fear Street Part 1

फियर स्ट्रीट पार्ट 1 हे लेखक आरएल स्टाईनच्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. लेह जनियाकचे दिग्दर्शन असून २ जुलै, २०२१ मध्ये नेटफ्लिक्स ओरिजिनल वर रिलीज करण्यात आला होता.

SCROLL FOR NEXT