पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन दणक्यात सुरू आहे. कार्यक्रमाच्या टीआरपीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता चौथा आठवडा सुरू झाला असून आज टीम A आणि टीम B अशा दोन गटांमध्ये 'सत्याचा पंचनामा' होणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य कधी खरं बोलतील आणि कधी काय कोणापासून लपवतील हे सांगू शकत नाही. त्यामुळे 'सत्याचा पंचनामा'मध्ये ते काय धमाका करणार हे पाहावे लागेल.
'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये "आज होणार आहे सत्याचा पंचनामा", असं म्हटलं जात आहे. तर 'सत्याचा पंचनामा'मध्ये जान्हवी बसलेली असून 'बिग बॉस म्हणत आहेत,"आपण या खेळात निक्की यांची सावली आहात. आपलं स्वत:चं असं अस्तित्व नाही". त्यावर टीम B मधील सदस्य सहमती दर्शवतात.
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात डीपी आग लावताना दिसत आहे. डीपी निक्कीच्या टीमला सांगतोय,"तुम्ही एखादी गोष्ट बोलता तेव्हा घनशाम मला ते येऊन सांगतोय. लहानसहान गोष्टी नकळत तो बोलून जातो. योगिता जाण्याआधी तिच्याजवळ येऊन तो बोलत होता,"ताई तू गेल्यावर मला कोणाचा आधार आहे". त्यावर योगिता म्हणाली होती, "मी याला कधी जवळ केलंय".