पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस मराठी'च्या घरात काही दिवसांपासून निक्की आणि अरबाजमध्ये अभिजीतमुळे खटके उडताना दिसत आहेत. त्यांच्यात एक दुरावा आला असून आजच्या भागात वर्षा ताई निक्की आणि अरबाजला समजावताना दिसणार आहेत. वर्षा ताईंमुळे निक्की आणि अरबाज यांच्यातील दुरावा कमी होणार आहे.
वर्षा ताई म्हणत आहेत, "मी मोठी आहे असं म्हणता मग इथे तरी माझं ऐका". पुढे निक्की म्हणते, "मी अरबाजला विचारलं की तुला बरं वाटतंय का आता". त्यावर वर्षा ताईंसमोर अरबाज म्हणतो, "ठिके". वर्षा ताई म्हणतात, "त्याला खूप छान वाटतंय..त्याची गळाभेट घे". निक्की आणि अरबाजचा अबोला मिटल्याने घरातील सर्व सदस्यदेखील आनंदी होतात.