पुढारी ऑनलाईन डेस्क - बागी ४ मधील संजय दत्तचा खतरनाक लूक समोर आला आहे. अनेक वर्षानंतर खलनायक संजय दत्त पुन्हा नव्या रुपात भेटीला येत आहे. अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) शी भिडायला तो तयाक असून संजय दत्तने इन्स्टाग्रामवर आपला नवा लूक शेअर केला आहे. हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात रिलीज होईल, असे म्हटले जात आहे. संजयने स्वत: चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज केले आहे.
याआधी टायगरने देखील आपला एक लूक शेअर केला होता. यामध्ये तो खूप भितीदायक दिसत होता. आता निर्मात्यांनी चित्रपटाच्या विलेन (villain) ची देखील घोषणा केली आहे. संजय दत्त (Sanjay Dutt) ने चित्रपटातील एक पोस्टर जारी केलं आहे. त्यामध्ये त्याचा खूप खतरनाक लूक दिसत आहे. लांब केस, रक्ताने माखलेले कपडे आणि आकांताने ओरडत असलेले हे पोस्टर आहे. पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय- ‘हर आशिक विलेन होता है.’
साजिद नाडियाडवाला प्रोडक्शन अंतर्गत आतापर्यंत बागीचे तीन भाग आले आहेत. प्रत्येक भागात टायगर श्रॉफ आहे. आता विलेन संजय दत्त अशणार. त्यामुळे दोघांमध्ये काय घडतं, हे पाहणंही तितकचं रंजक आहे.
दाक्षिणात्य दिग्दर्शक कोरिओग्राफर ए. हर्ष दिग्दर्शित हा चित्रपट ५ सप्टेंबर, २०२५ को रिलीज होईल.