Baaghi 4 Box Office Collection Day 5
मुंबई - टायगर श्रॉफच्या बागी -४ ने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली. पण नंतर, धिम्या गतीने कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. तिकिट बारीवर पाच केवळ ५ दिवसांत, साजिद नाडियाडवालाच्या चित्रपटाने ३९.७९ कोटी कमावले आहेत. चित्रपटाने पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवार ९ सप्टेंबरला ४.९४ कोटींची कमाई केली. त्यामुळे चित्रपट समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रियांसह सर्वांच्या नजरा बॉक्स ऑफिसवर टिकून राहिल्या आहेत.
टायगर श्रॉफ आणि संजय दत्त स्टारर 'बागी ४' चित्रपटाला आठवड्याच्या मध्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिकीट खिडकीवर अनेक स्पर्धक असल्याने कमाईचा प्रवास आव्हानात्मक बनला आहे. बागी-४ हा चित्रपट ८० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे आणि आतापर्यंत त्याने त्याच्या खर्चाच्या ५९ टक्के रक्कम वसूल केली आहे. कोरोना काळानंतर, टायगर श्रॉफचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून 'बागी-४' चे नाव पुढे आले आहे. असेही म्हटले जात आहे की, 'बडे मियाँ छोटे मियाँ' (६६ कोटी) विरुद्ध त्याची स्पर्धा असेल.
बजेट : ८० कोटी
भारतातील एकूण कमाई : ४७.२४ कोटी
परदेशातील एकूण कमाई : १० कोटी
वर्ल्डवाईड एकूण कमाई: ६५.७४ कोटी
ॲक्शन ड्रामाने भरपूर चित्रपटात टायगर शिवाय संजय दत्त, सोनम बाजवा, हरनाज संधू, शीबा आकाशदीप साबिर, श्रेयस तळपदे, सौरभ सचदेवा, उपेंद्र लिमये यासारखे कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.