Ayushmann Khurrana  
मनोरंजन

Ayushmann Khurrana : आयुष्मान खुरानाचा ‘रणबीर फोबिया’

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : अकारण जडून बसलेली भीती नेहमीच त्रासदायक असते आणि अगदी अलीकडे आयुष्मान खुरानाने ( Ayushmann Khurrana ) आपल्याला कारकिर्दीच्या प्रारंभिक टप्प्यात कोणती भीती सतावत होती, याचा खुलासा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. रणवीर सिंगने बॉलीवूडमध्ये जोरदार सुरुवात केल्यानंतर आपले कसे होणार, अशी भीती आपल्याला सतावत होती, असे आयुष्मान यावेळी म्हणाला.

'विकी डोनर' या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीचा श्रीगणेशा करणाऱ्या आयुष्मानने ( Ayushmann Khurrana ) आपली खास ओळख प्रस्थापित केली. मात्र, पहिल्या टप्प्यात आपली मनःस्थिती कशी होती, याचा त्याने अलीकडेच उलगडा केला.

तो म्हणाला, रणबीर कपूरने अभिनयाला सुरुवात केली, त्यावेळी मला अकारण भीती वाटली. आता आपले कसे होणार, असा माझ्यासमोर असायचा. पण, चित्रपट निर्माति शुजित सरकार यांना 'विकी डोनर'साठी मी योग्य आहे, असे वाटले आणि माझ्या कारकिर्दीतील हा माईलस्टोन ठरला.

आयुष्मान खुरानाने वयाच्या १७ व्या वर्षी 'पॉपस्टार' या टीव्ही शोमध्ये केले असून २००४ मध्ये 'रोडिज' या रियालिटी शोमध्ये तो सहभागी झाला होता. तो यात विजेताही ठरला. पत्रकारितेत पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर आयुष्मानने दिल्लीतील बिग एफएममध्ये रेडिओ जॉकी या नात्याने सुरुवात केली. नंतर त्याने टीव्हीसाठी सूत्रसंचालन केले आणि २०१२ मध्ये 'विकी डोनर'च्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT