पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलिवूडचा टॅलेंटेड सुपरस्टार आयुष्मान खुराना याने पहिल्यांदाच हरियाणवी पॉप म्युझिक मध्ये पाऊल टाकले आहे. वार्नर म्युझिक इंडिया सोबत मिळून त्याने त्याचा नवा ईपी "द हार्टब्रेक छोरा" आज रिलीज केला आहे. हा ईपी अनेक बाबतीत खास आहे. हे पहिल्यांदा घडत आहे की एका पंजाबी गायकाने हरियाणवी गाण्यासाठी आवाज दिला आहे.
सहसा हरियाणवी गाणी जोशपूर्ण आणि धडाकेबाज असतात. पण "द हार्टब्रेक छोरा" ब्रेकअपच्या भावनांना मस्तीभऱ्या बीट्स सोबत सादर करतो, जे याला वेगळे आणि हटके बनवते. पहिल्या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ पूर्णतः एआय-जेनरेटेड आहे, ज्यामुळे आयुष्मान खुराना बॉलिवूडमधील पहिला मुख्य प्रवाहातील कलाकार ठरला आहे, ज्याचा म्युझिक व्हिडिओ एआय टेक्नॉलॉजीने तयार करण्यात आला आहे.
हा ईपी तीन गाण्यांचा संकलन आहे: ‘द हार्टब्रेक छोरा’ – ब्रेकअपच्या भावनांना आनंदी आणि गूढ अंदाजात मांडणारे गाणे, ‘हो गया प्यार रे’ – एक हळुवार, रोमँटिक आणि सॉफ्ट मेलडी, ‘ड्राईव्ह टू मुरथल’ – एक धमाकेदार आणि अपबीट लव्ह सॉंग.
आयुष्मान खुराना म्हणतो, "हरियाणवी म्युझिक नेहमीच मला आवडत आले आहे आणि आता या शैलीमध्ये काहीतरी वेगळं आणि नवीन देण्याचा माझा मानस होता. हा ईपी नेहमीच्या ब्रेकअप गाण्यांपेक्षा वेगळा आहे - यात भावनाही आहेत आणि मजाही आहे! त्यामुळे मी याला 'अर्बन हरियाणवी' स्टाईल म्हटलं आहे. ज्यांना हरियाणवी संगीताची फारशी ओळख नाही, त्यांनाही ही गाणी आवडतील. याशिवाय, एआय तंत्रज्ञान आणि संगीत यांचं संगम घडवून आणण्याचं माझं स्वप्नही या प्रोजेक्टद्वारे साकार झालं आहे. मला खात्री आहे की प्रेक्षकांना हे खूप आवडेल!"
कुँवर जुनेजा आणि कृष्ण भारद्वाज यांनी लिहिलेल्या या गाण्याला जया रोहिल्ला आणि गौरव दासगुप्ता यांनी संगीत दिले आहे. हरियाणवी सल्लागार - वैभव देवान यांनी मार्गदर्शन केले आहे.