आयशा टाकियाचा नवा लूक समोर आला आहे  Ayesha Takia Instagram
मनोरंजन

Ayesha Takia | आयशा टाकियाला ओळखणेही कठीण? नवा लूक समोर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेत्री आयशा टाकियाने एक लेटेस्ट फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये तिला ओळखणेही कठीण झाले आहे. या फोटोमध्ये ती इतकी वेगळी दिसत आहे की, नेटकऱ्यांकडून तिला ट्रोल व्हावं लागलं.

अभिनेत्री आयशा टाकिया सलमान खानच्या वाँटेड चित्रपटात दिसली होती. तेथून तिला अधिक लोकप्रियता मिळाली. त्यानंतर अनेक वर्ष ती लाईमलाईटपासून दूर होती. आता ती आपल्या लुक्समुळे चर्चेत राहिली आहे. ती सोशल मीडियावर अधिक ॲक्टिव्ह आहे. ती अनेक फोटो पोस्ट करते. तिने नुकताच एक सेल्फी पोस्ट केली, त्यानंतर तिला ओळखणेही कठीण झाले आहे.

लेटेस्ट फोटोमध्ये वेगळ्या लूकमध्ये दिसली आयशा

आयशा टाकियाने इन्स्टाग्रामवर पिंक टोन मेकअप सोबत एक फोटो शेअर केला. त्यामध्ये ती निळ्या आणि गोल्डन कलरच्या साडीत दिसतेय. अनेक नेटिझन्सना तिला ओळखता आले नाही. अनेकांनी तिच्या या फोटोवर कॉमेंट करायला सुरुवात केली.

काय म्हणाले सोशल मीडिया युजर्स?

एका युजरने लिहिलं, 'तू तुझा चेहरा आणि नॅच्युरल ब्युटी का खराब केला? दुसऱ्याने कॉमेंट केलं, 'अशी का झाली आहेस तू. किती सुंदर होतीस तू'. तिसऱ्या युजरने कॉमेंट केलं, 'ही स्वत:ला काइली जेनर समजते.' एका अन्य युजरने कॉमेंट केलं -'काय गरज होती त्याची'.

अनेक वर्षे चित्रपटांपासून दूर होती आयशा टाकिया

आयशा टाकियाने टार्जन द वंडर कार, दिल मांगे मोर, सोचा ना था, शादी नंबर १, डोर, पाठशाला यासारख्या चित्रपटात काम केले आहे. पण पुढे आयशा अचानक चित्रपट इंडस्ट्रीतून गायब झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT