मनोरंजन

लग्नाच्या १७ वर्षानंतर आयशा जुल्का म्हणते, आम्हाला एकही मूल नाही

Pudhari News

मुंबई : पुढारी ऑनलाईन

९०च्या दशकात 'खिलाडी', 'जो जीता वही सिकंदर', 'हिम्मतवाला', 'वक्त हमारा है' आणि 'संग्राम' अशा अनेक चित्रपटातून बॉलिवूड अभिनेत्री आयशा जुल्काने रुपेरी पडद्या गाजवला. परंतु, आयशाने 'अदा… अ वे ऑफ लाइफ' या चित्रपटानंतर मोठा ब्रेक घेतला. यानंतर ती पुन्हा एकदा पडद्यावर आली परंतु, तिला चाहत्यांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. आयशा जुल्काने सध्या आपल्या खाजगी आयुष्यातील काही खुलासे केले आहेत.      

आयशाने एका मुलाखतीत आपल्या जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. यामध्ये तिने सांगितले आहे की, 'खूप लहान वयातच मी चित्रपटामध्ये काम करायला सुरूवात केली होती. लग्नानंतर मात्र, मला एक सामान्य माणसासारखे आयुष्य जगायचे होते. लग्नानंतर मी चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला. माझ्यामते, तो निर्णय अगदी योग्य होता. यादरम्यान आयशाला आपल्या खाजगी आयुष्यातील मुलांच्या बद्दल प्रश्न विचारला गेला. यावेळी आयशाने सांगितले की, 'अद्याप आम्हाला एकही मूल नाही, मला करिअरमुळे मूल नको होते. मी जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला होता. माझा हा निर्णय कुटुंबानेही मान्य केला होता. पतीनेही मला समजून घेतले होते. माझा पती समीर एक समजूतदार व्यक्ती आहे. आता मी ४८ वर्षांची असून माझा बराच वेळ आणि माझी शक्ती मी सोशल कामात घालवते.' 

अधिक वाचा : अनुप जलोटा बनणार आता सत्य साई बाबा 

याशिवाय आयशाने लग्नानंतर बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाचा मुळीच पश्चाताप नाही. मात्र, करिअरदरम्यान काही सिनेमे नाकारल्याचा पश्चाताप आजही  होत असल्याचे सांगितले. यात आयशाने बिझी शेड्यूलमुळे मणिरत्नम यांचा 'रोजा' आणि बिकिनी सीन्स द्यावे लागू नयेत म्हणून रामा नायडू यांचा 'प्रेम कैदी' हे चित्रपट नाकारले होते. याशिवाय आयशा नाना पाटेकरांसोबतच्या बोल्ड सीन दिल्यामुळे तुफान चर्चेत आली होती.  

अधिक वाचा : संजय कपूरची मुलगी शनायाच्या डान्सचा पुन्हा जलवा  

आयशाने कंस्ट्रक्शन टायकून समीर वाशीसोबत २००३ मध्ये लग्न केले होते. आता आयशा स्वत:ही एक यशस्वी बिझनेस व्हूमन बनली आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT