Awarapan 2 Teaser out pudhari photo
मनोरंजन

Awarapan 2 teaser | 'त्याच वेदना अन् एकाकीपणा..' १९ वर्षांनंतर 'शिवम' परततोय; 'आवारापन २'चा दमदार टीझर रिलीज

Emraan Hashmi Awarapan 2 teaser -'त्याच वेदना अन् एकाकीपणा..' १९ वर्षांनंतर 'शिवम' परततोय; 'आवारापन २'चा दमदार टीझर रिलीज

स्वालिया न. शिकलगार

Emraan Hashmi as returns as Shivam Pandit after 19 years

इमरान हाशमीच्या कारकिर्दीतील गाजलेल्या 'आवारापन' या चित्रपटाला १९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने निर्मात्यांनी चाहत्यांना खास भेट दिली आहे. बहुप्रतीक्षित 'आवारापन २'चा पहिला टीझर रिलीज करण्यात आला आहे. इमरान हाशमी पुन्हा एकदा 'शिवम पंडित' या लोकप्रिय भूमिकेत दिसणार आहे.

नितीन कक्कर दिग्दर्शित हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांत रिलीज होणार आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या टीझरमध्ये शिवम पंडितच्या भावनिक आणि संघर्षमय आयुष्याची झलक पाहायला मिळते. वेदना, एकाकीपणा आणि आयुष्याला नवा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या या पात्राचा प्रवास पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर उलगडणार असल्याचे टीझरमध्ये दिसते.

टीझरची सुरुवात इमरान हाशमीच्या डायलॉगने होते. त्यानंतर कथेची भावनिक बाजू समोर येते आणि शेवटी "इस बार यह आवारापन खत्म होगा, या मैं" असा डायलॉग ऐकू येतो. निर्माते विशेष भट्ट यांनी सांगितले की, चित्रपटाचा लोगो, टीझर मूळ 'आवारापन'चा आत्मा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मूळचा २००७ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

या टीझरचे आणखी एक आकर्षण म्हणजे चित्रपटातील सुपरहिट 'तो फिर आओ' या गाण्याचे नव्या धाटणीतील 'तो फिर आओ २.०' हे व्हर्जन. या गाण्याला मिथुन यांनी संगीत दिले असून, गीतकार सईद कादरी यांनी त्याचे बोल लिहिले आहेत.

'आवारापन २'मध्ये इम्रान हाश्मीसोबत दिशा पटानी, शबाना आझमी, सुरेंद्र विकी, विजयंत कोहली आणि अतुल कुमार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशेष भट्ट निर्मित, नितीन कक्कर दिग्दर्शित आणि बिलाल सिद्दीकी लिखित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आवारापन'चे दिग्दर्शन मोहित सुरी यांनी केले होते. इमरान हाशमीसोबत श्रिया सरन, मृणालिनी शर्मा, आशुतोष राणा आणि पूरब कोहली यांनीही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. प्रीतम यांच्या संगीताने सजलेल्या आणि सईद कादरी यांनी लिहिलेल्या 'तो फिर आओ', 'तेरा मेरा रिश्ता', 'मौला मौला', 'जुदा होके भी' आणि 'महिया' यांसारख्या गाण्यांनी आजही चाहत्यांच्या मनात खास स्थान कायम ठेवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT