Avatar: Fire and Ash ott release date fianl  pudhari photo
मनोरंजन

Avatar: Fire and Ash | 1.49 अब्ज डॉलर्स कमावणारा ‘अवतार फायर अँड ॲश’ आता OTT वर

Avatar: Fire and Ash OTT Release Date | ब्लॉकबस्टर चित्रपट आता घरबसल्या पाहता येणार

स्वालिया न. शिकलगार

हॉलिवूडमधील सर्वात चर्चित आणि भव्य चित्रपट मालिकांपैकी एक असलेल्या अवतार फायर अँड ॲश या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची अखेर अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. दिग्दर्शक James Cameron यांच्या या व्हिज्युअल स्पेक्टॅकलने जगभरातील बॉक्स ऑफिसवर तब्बल 1.49 अब्ज डॉलर्सची कमाई करत प्रचंड यश मिळवले होते. आता थिएटरमध्ये जवळपास सहा महिन्यांचा यशस्वी प्रवास पूर्ण केल्यानंतर हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून ओटीटी रिलीजची माहिती शेअर करण्यात आली. त्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''Avatar: Fire and Ash हा चित्रपट 24 जूनपासून केवळ Disney+ वर स्ट्रीमिंग.. '' यानंतर जगभरातील अवतार चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित चित्रपटाला जूनची प्रदर्शनाची तारीख मिळालीय. जेम्स कॅमेरॉनचा नवीन भव्य चित्रपट पुढील महिन्यात ओटीटीवर घरबसल्या पाहता येणार आहे.

या चित्रपटाने जगभरात तब्बल 1.49 अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई केली आहे. हा चित्रपट आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत १६ व्या क्रमांकावर आहेजेम्स कॅमेरुनच्या दिग्दर्शनामुळे अवतार मालिकेचा प्रत्येक भाग जागतिक स्तरावर चर्चेत राहिला आहे. त्यामुळे या नव्या चित्रपटाच्या डिजिटल रिलीजकडे केवळ हॉलिवूड चाहत्यांचेच नव्हे, तर भारतीय प्रेक्षकांचेही लक्ष लागले आहे. आता २४ जूनपासून हा चित्रपट ओटीटी वर किती नवे रेकॉर्ड करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'अवतार: फायर अँड ॲश'ची कथा

James Cameron दिग्दर्शित ‘Avatar’ सीरीजमधील हा पुढचा भाग पँडोरा या परग्रहावरील जगात घडतो, जिथे मानव आणि Na’vi जमाती यांच्यातील संघर्ष अजूनही संपलेला नाही. एक अग्नी (Fire) घटकावर आधारित आणि दुसरी राख (Ash) घटकावर आधारित या दोन्ही जमातींची संस्कृती, विचारसरणी आणि युद्धनीती पूर्णपणे वेगळी आहे. 'नेतेयाम'च्या (Neteyam) मृत्यूनंतरच्या पार्श्वभूमीवर आधारित 'अवतार: फायर अँड ॲश' या चित्रपटात 'जेक सली', 'नेयतिरी' आणि त्यांचे कुटुंब 'मेटकायिना' (Metkayina) जमाती लढताना चित्रण करण्यात आले आहे.

Jake Sully आणि Neytiri पुन्हा एकदा आपल्या कुटुंबासह या संघर्षाच्या केंद्रस्थानी येतात. या वेळी त्यांना फक्त बाह्य मानव आक्रमणाचाच नव्हे, तर पँडोरामधील अंतर्गत जमातींच्या संघर्षाचाही सामना करावा लागतो. Fire clan अधिक आक्रमक आणि युद्धप्रिय दाखवला जातो, तर Ash clan अधिक रहस्यमय आणि कठोर मूल्ये असलेला आहे.

मागील वर्षी चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्याच आठवड्याच्या देशांतर्गत 89.16 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची कमाई केली होती तर दोन आठवड्याच्या आत १ अब्ज डॉलर्स कमाई केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT