Atlee Kumar love letter to shahrukh khan
मुंबई - दीर्घ सिनेकरिअरमध्ये प्रथमच शाहरुखला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. जवान चित्रपटात सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा एक ऐतिहासिक अनुभव असल्याचे सांगत शाहरुख खानने व्हिडिओच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली आहे. आता जवान चित्रपटाचे दिग्दर्शक एटली कुमारने देखील इमोशनल पोस्ट लिहिली आहे. माझे हे तुम्हाला लिहिलेले पहिले लव्ह लेटर आहे, असे म्हणत शाहरुखच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर त्याने एक खास पोस्ट शेअर केलीय.
शिवाय, ‘जवान’च्या शूटिंग वेळी कॅमेराबद्ध केलेले दोन फोटो त्याने शेअर केला आहे. या पोटोंमध्ये त्यांची खास बॉन्डिंग दिसते.
''धन्य वाटत आहे, @iamsrk सर. आमच्या 'जवान' चित्रपटासाठी तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला याचा मला खूप आनंद आहे. तुमच्या प्रवासाचा भाग असणे खूप भावनिक आणि प्रेरणादायी वाटते. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि हा चित्रपट दिल्याबद्दल धन्यवाद, सर. हे माझे तुम्हाला लिहिलेले पहिले प्रेमपत्र आहे; अजून बरेच काही येणार आहे, सर. धन्यवाद, @gaurikhan मॅडम, आणि @RedChilliesEnt हा चित्रपट आम्हाला दिल्याबद्दल...माझ्या टीमचे...माझी दिग्दर्शन टीम आणि @anirudhofficial भाऊ, जवानला उत्तम गाणी आणि संगीत दिल्याबद्दल आणि चलेया गाण्यासाठी अभिनंदन.''
''जवान चलेयाला आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप, खूप, खूप आनंदी आणि भावनिक वाटत आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या क्षणांपैकी एक आहे; शाहरुख सर तुमच्या जवळ असणे हा एक मोठा आशीर्वाद आहे, सर. एक चाहता म्हणून, तुमच्यासोबत काम करणे आणि चित्रपट बनवणे आणि तो शाहरुखच्या मोठ्या प्रमाणात सादर करणे, सर, हे देवाचा पवित्र आशीर्वाद आहे आणि शेवटी, देवाने आम्हाला आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण परत दिला..यापेक्षा जास्त काही मागू शकत नाही, सर. हे माझ्यासाठी पुरेसे आहे; मी तुमचा सर्वात चांगला चाहता आहे, सर. तुम्हाला खूप खूप प्रेम. तुम्हाला खूप खूप प्रेम. सर.''
‘जवान’ चित्रपटातील गाणे ‘चलेया’ गाणारी गायिका शिल्पा रावला देखील पुरस्कार मिळाला. यावर एटलीने लिहिलंय-हे आयुष्यातील खूप महत्त्वाचे क्षण आहेत. शाहरुख सर सोबत काम करणे आणि त्यांची उपस्थिती माझ्यासाठी एक मोठे आशीर्वाद आहे. एक फॅन बॉयच्या रूपात त्यांचा डायरेक्टर होणे आणि सोबत चित्रपट बनवणे माझ्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद आहे...'