Atharva Sudame on Subodh Bhave about cast fee  pudhari photo
मनोरंजन

Atharva Sudame on Subodh Bhave | सुबोध भावेंनी या शॉर्टफिल्मसाठी मानधन घेतले नाही; अथर्वने सांगितला किस्सा

Atharva Sudame on Subodh Bhave | सुबोध भावेंनी या शॉर्टफिल्मसाठी मानधन घेतले नाही; अथर्वने सांगितला किस्सा

पुढारी वृत्तसेवा

अभिनेता-दिग्दर्शक अथर्व सुदामेने एका मुलाखतीत सुबोध भावेंबद्दलचा हृदयस्पर्शी अनुभव सांगितला. आपल्या शॉर्टफिल्मसाठी सुबोध भावेंना विचारणा केली असता त्यांनी काय उत्तर दिले. आणि शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्यास होकार दिला. नवोदित दिग्दर्शकांवर विश्वास ठेवणाऱ्या सुबोध यांच्या या कृतीचे अथर्वने विशेष कौतुक केले.

Atharva Sudame on Subodh Bhave about cast fee behind story of short film

अभिनेता सुबोध भावे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. दिग्दर्शक अथर्व सुदामेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट शेअर करत गोंदवलेकर महाराजांवरील आगामी शॉर्टफिल्मच्या निर्मितीमागचा अनुभव सांगितला आहे. या पोस्टसोबत त्याने चित्रपटातील सुबोध भावे यांचा गोंदवलेकर महाराजांच्या वेशातील लूक आणि शूटिंगदरम्यानचे काही व्हिडिओही शेअर केले आहेत.

अथर्व सुदामेने पोस्टमध्ये सांगितले की, गोंदवलेकर महाराजांवर शॉर्टफिल्म बनवण्याची इच्छा त्याच्या मनात अनेक दिवसांपासून होती. महाराजांप्रती असलेल्या श्रद्धेतून त्यांच्या कार्याची ओळख अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने त्याने ही शॉर्टफिल्मची निर्मिती करण्यास घेतली. मात्र, या भूमिकेसाठी त्यांच्या मनात सुरुवातीपासून एकच नाव होते आणि ते म्हणजे सुबोध भावे.

अथर्वने शॉर्टफिल्मची कथा सुबोध भावेंना पाठवली. कथा आवडताच त्यांनी कोणताही विलंब न लावता यासाठी होकार दिला. त्यानंतर शूटिंगही सुरळीत आणि समाधानकारक पूर्ण झाल्याचे त्याने नमूद केले.

शूटिंग संपल्यानंतर सुबोध भावेंनी स्वतः अथर्वलाना फोन करून, "तुला तुझ्या मनासारखं सगळं झालं ना?" अशी प्रेमळ विचारपूस केली. अथर्वने होकार देत समाधान व्यक्त केले. त्यानंतर मानधनाचा विषय काढला. त्यावर सुबोध भावेंनी, "या गोष्टीचा काही संबंध नाही. तू चांगलं काम करतोयस... कर, मी आहे." असे उत्तर दिले.

अथर्व सुदामेने सुबोध भावेंसोबत झालेल्या संवादाबद्दल पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. त्यांच्या या शब्दांनी आपण भारावून गेलो, असे अथर्वने लिहिले आहे. त्याच्या मते, आयुष्यात जेव्हा जेव्हा एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात करतो, तेव्हा मनातून असा आवाज येत असतो आणि यावेळी तोच संदेश सुबोध भावेंच्या शब्दांत ऐकू आला. त्या क्षणी आपल्याला गोंदवलेकर महाराजांचाच आशीर्वाद लाभल्याची भावना झाल्याचे त्याने व्यक्त केले.

पोस्टच्या शेवटी अथर्वने ही शॉर्टफिल्म आपल्या आयुष्यातील अत्यंत खास अनुभव असल्याचे सांगितले आहे. गोंदवलेकर महाराज आणि सुबोध भावे या दोघांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्याने "श्रीराम जय राम जय जय राम" असा जयघोषही आपल्या पोस्टमध्ये लिहिला आहे.

दरम्यान, या पोस्टवर चाहत्यांकडूनही भरभरून प्रतिक्रिया उमटत आहे. शॉर्टफिल्मची सुंदर कल्पना निर्मिती उतरवल्याबद्दल चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी अथर्वचे अभिनंदनही केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT