तगड्या कलाकारांचा चित्रपट येतोय Instagram
मनोरंजन

'आता थांबायचं नाय!' चित्रपटाचे दमदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!

Ata Thambaycha Naay |'आता थांबायचं नाय!' चित्रपटाचे दमदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित शिवराज वायचळ दिग्दर्शित मराठी चित्रपट 'आता थांबायचं नाय!' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित या चित्रपटाच पोस्टर करण्यात आले. पोस्टर पाहून आपल्याला समजेल की या सिनेमात उत्कृष्ट मराठी कलाकारांची मोठी फौज आहे. या पोस्टरमध्ये अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमगर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, रुपा बोरगांवकर आणि आशुतोष गोवारीकर तसेच आणखी काही बालकलाकार दिसत आहेत.

आपल्या दैनंदिन जीवनाच्या अडचणीतून वाट काढत आपल्या यशाची कहाणी लिहिताना माणसाला कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते. हा तुमच्या-आमच्या सारख्या एका सामान्य माणसाचा प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

'आता थांबायचं नाय!' या सिनेमाच्या पोस्टरवर सर्वांच्या चेहऱ्यावर आपण हसू आणि काहीतरी मिळवल्याचा , विजयाचा आनंद पाहू शकतो* पण त्या हसण्यामागे किती संघर्ष आहे, हे येत्या १ मे ला सिनेमागृहात कळेल. उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी, धरम वालिया निर्मित हा चित्रपट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT