Asurvan Trailer released  Instagram
मनोरंजन

Marathi Movie Asurvan Trailer | ‘असुरवन’चा थरार! फिरस्त्या देवाची गूढ कथा; ट्रेलर पाहिला का?

Asurvan Trailer | वारली संस्कृतीचं चित्तथरारक दर्शन घडणारं ‘असुरवन’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

स्वालिया न. शिकलगार

Asurvan Trailer launched

मुंबई - दिग्दर्शक सचिन आंबात यांच्या ‘असुरवन’ या चित्रपटाची. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. फिरसत्या देवाच्या गूढ आणि भयावह कथानकाची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा येतो. ट्रेलरची सुरुवात गडद जंगल, रहस्यमय वातावरण आणि अस्वस्थ करणाऱ्या ध्वनींनी होते.

“फिरसत्या देवाचा कोप कोणीही रोखू शकत नाही…” असा संवाद पुढे येताच कथा अधिकच रोमहर्षक बनते. जंगलातील एका गूढ शक्तीभोवती फिरणारी ही कथा साध्या घटनांपासून सुरू होत हळूहळू भीषण वळण घेत असल्याचे ट्रेलर स्पष्टपणे दाखवतो.

या चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा अभिनेता हार्दिक जोशी यांच्या हस्ते मुंबईत पार पडला. यावेळी अनुज ठाकरे, दीप्ती धोत्रे, विपुल साळुंखे, विश्वास पाटील, पूजा मौली, इतर कलाकार उपस्थित होते. स्वप्नस्वरूप निर्मित 'असुरवन' हा चित्रपट ५ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

'असुरवन' चित्रपटाचं मोशन पोस्टर आणि टीजर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. पण काही दिवसात एक मन सुन्न करणारी घटना घडली. 'असुरवन' चित्रपटातील मुख्य अभिनेता सचिन चांदवडे याच्या निधनाचे वृतत येऊन धडकले. पण 'असुरवन' चित्रपटाच्या टीमने हा चित्रपट रिलीज करण्याचे ठरवले.

हे असतील कलाकार

या चित्रपटात विश्वास पाटील, सुरज नेवरेकर, दीप्ती धोत्रे, पूजा मौली, मयूरेश जोशी, रोहिणी थोरात, हर्षद वाघमारे, सिद्धेश शिंदे, विशाल साठे, संदीप पाटील, सूरज परब, अनुज ठाकरे, सचिन चांदवडे, विपुल साळुंखे, विनायक चव्हाण, योगिता पाखरे, योगेश शेडगे, प्रणव दळवी, तनिषा जाधव, निकिता मेस्त्री, व्यंकटेश गावडे, श्याम सावंत, सनी जाधव, कल्पेश डुकरे, गणेश गायकवाड यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

काय आहे चित्रपटात?

‘असुरवन’च्या ट्रेलरमध्ये कोकणातील निसर्गाची खर्‍या अर्थाने अनुभूती मिळते. कोकणातील आदिवासी पाड्यांचे दैनंदिन जीवन, त्यांची वारली कला, परंपरा आणि रूढी यांची झलक चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. शापित डोंगरमाथ्यावर घडलेल्या गूढ घटनांभोवती फिरणारी कथा आणि फिरसत्या देवाचा अकल्पित कोप ही यातील प्रमुख आकर्षणे आहेत. ट्रेलरमध्ये दिसणारा सूर्याच्या मुखवट्याचा रहस्यमय चेहरा नेमका कोणाचा, हा मोठा प्रश्न उभा राहतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT