मनोरंजन

‘घरत गणपती’ : अजिंक्य देव-आश्विनी भावे पुन्हा जोडी जमणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजवर रुपेरी पडद्यावर नायक नायिकेच्या अनेक लोकप्रिय जोड्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवणारी अशीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे अजिंक्य देव आणि अश्विनी भावे. लवकरच पुन्हा एकदा ही जोडी 'घरत गणपती' या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने रसिक दरबारी हजेरी लावणार आहे.

अधिक वाचा-

पॅनोरमा स्टुडिओज आणि नॅविअन्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने 'घरत गणपती' हा भव्य चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी 'घरत गणपती' चित्रपटाची निर्मिती केली आहे.

अधिक वाचा-

शरद घरत आणि अहिल्या घरत या व्यक्तिरेखा ते साकारणार आहेत. या चित्रपटात अजिंक्य देव आपल्याला कुटुंबवत्सल पती, प्रेमळ वडील अशा भूमिकेत दिसणार असून कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहणाऱ्या करारी आईची व्यक्तिरेखा अश्विनी भावे साकारणार आहेत.

अधिक वाचा-

याआधी 'शाब्बास सूनबाई','मायेची सावली','चल गंमत करू', 'सरकारनामा' या चित्रपटांद्वारे आमच्यातली केमिस्ट्री पडद्यावर चांगलीच खुलली. आता २५ वर्षांनी 'घरत गणपती' चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करण्याचा आनंद व्यक्त करीत, आमची केमिस्ट्री रसिकांना आनंद देईल, असं हे दोघे सांगतात

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT