आशिष कपूर  Pudhari
मनोरंजन

Ashish Kapoor: महिलेला जबरदस्ती बाथरूममध्ये नेले... मारहाणही केली... बलात्कारी अभिनेत्याला पुण्यातून अटक

आशिषविरोधात राजधानी दिल्लीतील सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला

अमृता चौगुले

टेलिव्हिजन अभिनेता आशिष कपूरला पुण्यातून अटक झाली आहे. आशिषवर बलात्काराचा आरोप आहे. एनआयने दिलेल्या माहितीनुसार आशिषविरोधात राजधानी दिल्लीतील सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Entertainment News)

आशिषवर नजर ठेवून त्याला अटक केल्याचे समोर येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार तक्रार दाखल करणाऱ्या महिलेने आशिषवर बलात्कार केल्याचा आरोप केला. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीतील एका हाऊस पार्टीदरम्यान आशिषने बाथरूममध्ये तिला मारहाण केली. यानंतर 11 ऑगस्टला प्राथमिक माहितीनुसार तक्रार दाखल केली गेली. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला या महिलेने दिलेल्या तक्रारीत इतरही व्यक्तींची नावे होती. पण तिने नंतर पुन्हा दिलेल्या जबाबात बदल केला आणि फक्त आशिषवरच बलात्काराचा आरोप केला.

तपास सुरूच

पोलिस या प्रकारच्या प्रत्येक गोष्टीचा तपास करत आहेत. या महिलेने आरोप केला की या घटनेचा व्हीडियोही बनवला होता. पण पोलिसांना तपासात अजूनतरी कोणताही व्हीडियो मिळाला नाही. आशिषला सध्या न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

इंस्टाग्रामवर झाली होती ओळख

या महिलेने सांगितल्याप्रमाणे आशिष आणि तिची ओळख इंस्टाग्रामवर झाली होती. त्यांनंतर त्याने तिला एका मित्राच्या घरी हाऊस पार्टीला बोलावले. ही घटना तिथेच घडल्याचे समोर आले.

आशिषचा मित्र, त्याची पत्नी आणि दोन आणखी लोकांच्या विरोधातदेखील एफआयआर दाखल झाली होती. या महिलेच्या तक्रारीनुसार आशिष आणि त्याच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. तर सोबत असलेल्या मित्राच्या पत्नीने तिला मारहाण केली. सध्या या प्रकरणात आशिष आणि त्याच्या पत्नीला जमीन मिळाला आहे.

त्या दिवशी नेमके काय घडले होते?

सीसीटीव्ही फुटेजवरुन आणि साक्षीदारांच्या जबाबानुसार ती महिला आणि आशिष बाथरूममध्ये गेले. जेव्हा ते बराच काळ बाहेर आले नाही त्यावेळी पार्टीतील इतरांनी दरवाजा ठोठावला. यादरम्यान दोघांत वाद झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

कोण आहे आशिष कपूर?

आशिषने अनेक सिरियलमध्ये काम केले आहे. ज्यात सरस्वतीचंद्र, लव्ह मॅरेज या अरेंज मॅरेज, चाँद छुपा बादल मे, देखा एक ख्वाब, ये रिश्ता क्या कहलाता है, वो अपना सा आणि बंदिनी या मालिकेचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT