Asha Bhosale death rumour Pudhari
मनोरंजन

Asha Bhosale Death Rumour: हे खोटे आहे ! आशा भोसले यांच्या मृत्यूच्या अफवेबाबत मुलाने दिले स्पष्टीकरण

या पोस्टमध्ये आशा भोसले यांचे निधन झाल्याचे लिहिले आहे

अमृता चौगुले

शबाना शेख नावाच्या एका युजरद्वारे फेसबूकवर एक पोस्ट व्हायरल झाली. ही पोस्ट व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. या पोस्टमध्ये आशा भोसले यांचे निधन झाल्याचे लिहिले आहे. याशिवाय या पोस्टवरील आशाजी यांचा हार घातलेला फोटोही शेयर केला आहे. हा फोटो आणि पोस्ट व्हायरल होताच आशा भोसले यांच्या चाहत्यांना काळजी वाटू लागली.

यानंतर आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले याने ही पोस्ट खोटी असल्याचे सांगत अफवांचे खंडन केले आहे. तसेच अशा अफवा न पसरवण्याचे आवाहनही केले आहे.

काय होते पोस्टचे कॅप्शन?

प्रसिद्ध गायिका आशा भोसलेचे संगीत युगात 1 जुलै 2025 ला निधन झाले आहे.

आशा भोसले यांना रेखाचा सिनेमा उमराव जान च्या रिरिलीज दरम्यान पाहिले गेले होते. आशा आपली नात जनाई हिच्यासोबत तिथे आल्या होत्या. यावेळी आशा यांनी 'दिल चीज क्या है' गाण्याच्या काही ओळीही गाताना दिसल्या.

1950 पासून ते 1970 पर्यंत आशा भोसले यांच्या गाण्याने मनोरंजन विश्वात स्वत:चा असा खास प्रेक्षक वर्ग तयार केला. तब्बल आठ दशके त्यांची गाणी भारतीय प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.

हिंदी शिवाय आशा यांनी विविध भारतीय भाषांत गाणी गायली आहेत. त्यांना 2000 मध्ये दादासाहेब फालके पुरस्कार तर 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

अलीकडेच 27 जूनला त्यांनी पती आणि प्रसिद्ध संगीतकार राहुल देव बर्मन यांना 85 व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT