Aryan Khan ‘The Bads Of Bollywood’ First look revealed
मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची बहुप्रतीक्षित डॉक्युमेंट्री ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’चा फर्स्ट लूक नेटफ्लिक्सने रिलीज केला आहे. आर्यन कानचे हे दिग्दर्शकीय पदार्पण आहे. रविवारी निर्मात्यांनी आर्यन खानच्या दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' या मालिकेचा पहिला लूक रिलीज केला होता. त्यानंतर चित्रपट निर्माता करण जोहरने भाकीत वर्तवले की, ही डॉक्यमेंट्री सर्व रेकॉर्ड मोडेल.
या डॉक्युमेंट्रीचा प्रिव्ह्यू २० ऑगस्ट रोजी रिलीज होईल.
करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीजच्या स्टोरीज सेक्शनमध्ये लिहिले : "आर्यन! लव्ह यू! हे सर्व रेकॉर्ड मोडणार आहे! मला तुझा अभिमान आहे." दुसऱ्या स्टोरीमध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, "या अविश्वसनीय मालिकेत आमचा मुलगा मुख्य भूमिकेत चमकत असल्याचे पाहून मला खूप अभिमान वाटतो!!! रेड कार्पेट तयार आहे @lakshya! Go KILL it!"
फर्स्ट लूक व्हिडिओमध्ये आर्यन खान एक वेगळ्या अंदाजात दिसतो. ज्यामध्ये तो जुन्या चित्रपटातील डायलॉग लिपसिंग करताना दिसत आहे. यामध्ये शाहरुख खानचा आवाज दिला आहे. पहिला लूक शेअर करताना नेटफ्लिक्सने कॅप्शनमध्ये लिहिले, अधिक झालं? आता सवय करून घ्या. व्हिडिओमध्ये आर्यन रोमँटिक सेटअपमधून चालत असताना, शाहरुखच्या 'मोहब्बतें' या आयकॉनिक चित्रपटातील फेमस डायलॉग म्हणताना दिसत आहे - "एक लडकी थी दीवानी सी, एक लडके पे वो मारती थी, नजरें झुका के, शर्मा के, गलियों से गुजरती थीं..."
या डॉक्युमेंट्रीवर आर्यन खान दीर्घकाळ काम करत होता. याची चर्चा मागील वर्षी शाहरुख खानने अनेक मुलाखतींमध्ये केली हती. 'द बॅड्स ऑफ बॉलीवुडचे प्रमोशन करत शाहरुख खानने नुकताच एक #AskMe सेशन सोशल मीडियावर केले होते. एका युजरने त्यांना प्रश्न विचारला की, 'तुम्ही आर्यनला हिरो म्हणून कधी लॉन्च करणार? त्यावर शाहरुखने मजेशीर अंदाजात उत्तर दिले होते, 'डॉक्युमेंट्री द बॅड्स ऑफ बॉलीवूड पाहिल्यानंतर त्याला एक दिग्दर्शक म्हणून प्रेम द्या...आता घरात स्पर्धा नको...'