सिनेजगतात कोणाची कधी मैत्री होईल, तर कधी वाद होईल, हे काही सांगता येत नाही. गेल्या दिवसांपासून अभिनेता अर्शद वारसी याने केलेल्या एका वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. प्रभासने 'कल्कि २८९८ एडी' सिनेमातील साकारलेल्या भूमिकेवर वक्तव्य केले होते. त्यामुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागले होते. अर्शदने प्रभासला 'जोकर' असेही म्हटले. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला, मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्यांनी अर्शदवर टीका केली. अखेर अर्शदने या बादावर मौन सोडले आहे. अर्शदने नुकतेच आयफा अवॉर्डस् - २०२४ या पुरस्कार सोहळ्यात याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
अर्शद म्हणाला की, मी जे काही बोललो ते 'कल्कि २८९८ एडी 'मध्ये प्रभासने जी भूमिका साकारली आहे त्याबाबत ! त्याने जी भैरव ही भूमिका साकारली त्यावर बोललो. मी त्याच्यावर वैयक्तिक कोणतीही टीका केलेली नाही. प्रत्येकाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. मी प्रभासच्या भूमिकेबाबत बोललो. प्रभास एक उत्कृष्ट अभिनेता हे त्याने वारंवार दाखवून दिले आहे, हे सर्वांना माहीत आहे. आपण एखाद्या चांगल्या अभिनेत्याला अशो वाईट भूमिका करताना पाहतो, त्यावेळी प्रेक्षकांनाही खूप दुःख होते. आता अर्शदने दिलेल्या स्पष्टीकरणाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.