पुढारी ऑनलाईन डेस्क - संगीत जगतातील प्रसिद्ध गायक अरमान मलिकने २ जानेवारी, २०२५ रोजी आशना श्रॉफशी लग्न केले आहे. आशना ही अरमानची गर्लफ्रेंड असून इन्फ्लुएंसर आहे. दोघांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या लग्नाचे काही सुंदर फोटोज शेअर केले आहेत.
अरमान-आशनाच्या इन्स्टाग्राम पोस्टवर ‘तू ही मेरा घर’ अशी कॅप्शन लिहिलेली आहे. फोटोमध्ये दोघे एकमेकांकडे हसताना दिसत आहेत. एका फोटोमध्ये ते हातात हात घेऊन उभे आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये अरमान जयमाला समारंभात हसताना दिसत आहे. हे फोटो त्याच्या फॅन्सच्या पसंतीस उतरले आहेत.