मनोरंजन

Arjun Tendulkar Saaniya Chandhok Wedding : अर्जुन-सानिया विवाहबंधनात; महालक्ष्मी रेसकोर्सवर रंगला शाही विवाहसोहळा (PHOTO)

क्रिकेट, बॉलिवूड, राजकीय आणि उद्योगजगतातील दिग्गजांनी हजेरी लावली.

रणजित गायकवाड

मुंबई : क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाहसोहळा मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे अत्यंत थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला क्रिकेट, बॉलिवूड, राजकीय आणि उद्योगजगतातील दिग्गजांनी हजेरी लावली. अर्जुन तेंडुलकरने आजपासून आपल्या आयुष्याच्या नवीन इनिंगला सुरुवात केली आहे.

आजी-माजी दिग्गज क्रिकेटपटूंची उपस्थिती

या विवाहसोहळ्याला रवी शास्त्री, राहुल द्रविड, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, हरभजन सिंग, अजित आगरकर, झहीर खान, इरफान पठाण, युसूफ पठाण, सुरेश रैना, श्रेयस अय्यर, आकाश चोप्रा यांसारख्या माजी क्रिकेटपटूंनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. तसेच, चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि आमीर खान यांच्या उपस्थितीने या सोहळ्याची शोभा अधिकच वाढली.

राजेशाही थाटात सजले नवदाम्पत्य

विवाहसोहळ्यात अर्जुन आणि सानिया यांचा लूक अत्यंत रॉयल आणि मोहक दिसत होता. अर्जुनने गडद लाल रंगाची, सोनेरी नक्षीकाम केलेली शेरवानी परिधान केली होती. यासोबत मॅचिंग कुर्ता, पांढरी ट्राउझर आणि ब्राऊन लोफर्स असा त्याचा क्लासिक अंदाज सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

...आणि साजेसा मेकअप

दुसरीकडे, सानिया चंडोक लाल आणि पीच रंगाच्या भरजरी जरीकाम असलेल्या साडीमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती. तिने हिरे आणि पाचू जडीत दागिने परिधान केले होते. मोकळे केस आणि साजेसा मेकअप तिच्या या वधूच्या रूपाला अधिकच खुलवत होता.

अंबानी परिवाराचा रॉयल अंदाज

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली. नीता अंबानी यांनी 'स्वदेश' ब्रँडची सोनेरी-आयवरी सिल्क साडी परिधान केली होती, ज्यावर अत्यंत नाजूक नक्षीकाम होते. जड हिऱ्यांचा हार आणि मॅचिंग कानातल्यांमुळे त्यांचा लूक अतिशय राजेशाही वाटत होता. मुकेश अंबानी यांनी नेहमीप्रमाणे क्लासिक काळ्या रंगाचा 'बंदगला' सूट परिधान केला होता.

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा इंडो-वेस्टर्न लूक

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांची जोडी या विवाहसोहळ्यात आकर्षणाचे केंद्र ठरली. श्लोकाने पेस्टल ग्रीन आणि पीच शेडचा फ्लोरल लेहेंगा आणि आधुनिक पद्धतीची 'केप-स्टाईल' चोली परिधान केली होती. तर आकाशने आपल्या पत्नीच्या पेहरावाशी सुसंगत अशी पांढऱ्या आणि हिरव्या रंगाची शेरवानी परिधान केली होती, ज्यावर पाचूच्या हिरव्या रंगाचे (Emerald Green) नक्षीकाम होते.

'किंग खान'ची सहकुटुंब एन्ट्री

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आपली पत्नी गौरी खान आणि कन्या सुहानासह या सोहळ्यात सहभागी झाला. शाहरुखने ऑफ-व्हाईट रंगाची अचकन परिधान करून 'विंटेज लूक' दिला होता, तर गौरी खान पिवळ्या रंगाच्या भरतकाम केलेल्या साडीत अत्यंत ग्रेसफुल दिसत होती. सुहानाने देखील पेस्टल फ्लोरल लेहेंग्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

युवराज आणि हेजलचा 'ट्विनिंग' अवतार

माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेजल कीच यांचा पेहराव साधेपणा आणि स्टाईलचा उत्तम संगम होता. युवराजने गडद मरून आणि ग्रे शेडची अचकन घातली होती, तर हेजलने मरून रंगाचा ब्लाउज आणि काळ्या रंगाची भरजरी फ्लोरल साडी नेसून आपला लूक पूर्ण केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT