अर्जुन रामपालने बाबा महाकालचे दर्शन घेतले Instagram
मनोरंजन

अर्जुन रामपाल बाबा महाकालच्या दर्शनाला, भस्म आरतीत भक्तीत तल्लीन अभिनेता

Arjun Rampal | अर्जुन रामपाल बाबा महाकालच्या दर्शनाला, भस्म आरतीत भक्तीत तल्लीन अभिनेता

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामापाल शनिवारी उज्जैन येथील महाकालच्या दरबारी पोहोचला. याठिकाणी भस्म आरतीमध्ये तो सहभागी झाला. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात जाऊन अर्जुनने दर्शन घेतले. अर्जुन रामपालने स्वत: फोटोज शेअर करून माहिती दिली.

मंदिराची झलक फोटोंमध्ये

अर्जुन रामपालने इन्स्टाग्रामवर महाकाल मंदिराची झलक शेअर केलीय. अर्जुन रामपाल याठिकाणी शूटिंगच्या निमित्ताने आला होता का, याबबत माहिती मिळालेली नाही. पण यावर्षी अर्जुन अनेक चित्रपटात दिसणार आहे. रिपोर्टनुसार, अर्जुनकडे १४ चित्रपट असल्याची माहिती आहे. यातील काही चित्रपट पुढील वर्षी रिलीज होऊ शकतात. कॉकटेल-२, राना नाइडू, ब्लाईंड गेम, जुला कन्नौज, इश्क झमेला अशा चित्रपटांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT