ए आर रहमान-सायरा बानो यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे  instagram
मनोरंजन

A R Rahman - Saira Banu Divorce : ए आर रहमान २९ वर्षांनंतर घेणार घटस्फोट

ए आर रहमान यांचा तब्बल २९ वर्षांनंतर घटस्फोट, पत्नी सायरा बानो...

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी २९ वर्षांच्या लग्नानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

ए आर रहमान, सायरा बानो यांनी अलग होण्याची घोषणा केली आहे. ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान आणि पत्नी सायरा बानो यांनी मंगळवारी वेगळे होण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या फॅन्सना धक्का बसला आहे. ते म्हणाले, की, “हा निर्णय त्यांच्या नात्यातील महत्वपूर्ण भावनात्मक तणावात बदललं आहे.”

सायरा यांचे वकील वंदना शाह यांनी कपल वेगळे होण्याच्या निर्णयावर स्टेटमेंट जारी केलं आहे. स्टेटमेंमध्ये म्हटले आहे की, “मिसेस सायरा आणि त्यांचे पती प्रसिद्ध संगीतकार अल्लाहरक्का रहमान (ए. आर. रहमान) यांच्याकडून आणि त्यांच्या निर्देशानुसार, वंदना शाह आणि असोसिएट्स कपल वेगळे होण्याच्या निर्णयाबद्दल स्टेटमेंट जारी करत आहे.

लग्नाच्या अनेक वर्षांनंतर मिसेस सायरा आणि यांच्या नात्यात तणाव आहे. त्या दोघांनी हा निर्णय दु;ख आणि पिडा पाहून घेतला आहे. ए. आर. रहमान या आव्हानात्मक परिस्थिती दरम्यान जनतेला गोपनीयता आणि त्यांच्या जीवनातील या कठीण अध्यायातून जात असताना समजून घेण्याची विनंती करत आहेत.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT