मुंबई : पुढारी ऑनलाईन
प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक, गायक आणि ऑस्कर पुरस्कार विजेते ए. आर. रेहमान (AR Rahman) यांना मातृशोक झाला आहे. रेहमान यांची आई करीमा बेगम यांचे चेन्नईमध्ये (AR Rahman mother Kareema Begum died in Chennai) आज (सोमवारी) निधन झाले. त्यांनी आपल्या आईचा फोटो सोशल मीडियावर टाकत ही दुःखद बातमी सांगितली. तर रेहमान यांच्या आई करीमा बेगम या काही काळापासून खूप आजारी होत्या.
मराठी अभिनेत्रींनी बिकिनी घातली म्हणून कुठं बिघडलं?
रेहमान यांनी सोशल मीडियावर आपल्या आईचा फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी त्यावर पोस्ट करण्यास सुरूवात केली. तसेच करीमा बेगम यांना श्रद्धांजली वाहण्यास ही सुरूवात केली. रेहमान हे आपल्या आईच्या खूप जवळचे होते आणि त्यांच्या सांगण्यावरूनच ते संगीत जगतात आले होते.
'दादला बुलेटवाला' धमाकेदार मराठी गाणं (Video)
रेहमान यांचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होता. दिलीप कुमार असे त्यांचे बालपणाचे नाव होते. त्यांचे वडिल आर.के. शेखर यांचे जेंव्हा निधन झाले त्यावेळी ते ९ वर्षांचे होते. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी रेहमान यांनी त्यांच्या बालपणाचा मित्र शिवमणि यांच्यासमवेत 'रहमान बँड रुट्स' साठी सिंथेसाइजर बनवले होते.
मी यौवन बिजली पाहून थिजली! अप्सरा सोनाली कुलकर्णीवरून हटणार नाही नजर! (photos)
रेहमान यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा वयाच्या २३ व्या वर्षी त्यांच्या बहिणीची तब्येत बिघडली. तेव्हा ते संपूर्ण कुटुंबासमवेत इस्लामिक धार्मिक ठिकाणी गेले होते. त्यानंतर त्यांची बहीण बरी झाली होती. त्यानंतर आमच्या कुटुंबावर या गोष्टीचा इतका परिणाम झाला की आम्ही धर्म परिवर्तन केला आणि इस्लाम धर्माचा स्विकार केला.
शाहिद कपूर तिसऱ्यांदा बाबा होणार? पत्नी म्हणते..
रेहमान यांनी १९९१ मध्ये चित्रपटासांठी संगीत देण्यास सुरूवात केली. तर चित्रपट निर्माते मणिरत्नम यांनी आपल्या 'रोजा' चित्रपटाला संगीत देण्याची त्यांना संधी दिली. हा दक्षिण भारतातील पहिला चित्रपट असेल ज्याची गाणे हिंदीत डब झाली आणि सुपरहिट ही झाली. तर रेहमान हे आशियातील पहिले व्यक्ती आहेत जे एकाच वर्षात दोन ऑस्कर पुरस्कारांनी सन्मानित झाले आहेत. त्याचबरोबर त्यांना 'स्लमडॉग मिलियनेअर' या गाण्यासाठी जगप्रसिद्ध 'अॅकॅडमी अवॉर्ड', बाफ्टा पुरस्कार आणि ग्रॅमी पुरस्कार ही मिळाला आहे. तर रेहमान यांना भारत सरकारच्या वतीने 'पद्मश्री' आणि पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.