पुढारी ऑनलाईन :
संगीतकार आणि गायक एआर रहमान यांना चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, त्यांना छातीत दुखत होते. ए.आर. रेहमान यांच्यावर उपचार सुरू होते. यानंतर त्यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एआर रहमान यांच्या टीमने माहिती दिली आहे, त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांचा घसा खवखवत होता आणि त्यांना डिहायड्रेशन झाले होते. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, ए.आर. रहमान परदेशातून परतले तेव्हा त्यांनी मानदुखीची तक्रार केली. यानंतर त्यांना छातीत दुखू लागले.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी ए.आर. रहमान यांच्या प्रकृतीची माहिती जाणून घेतली. त्यांनी आपल्या 'X' अकाउंटवर लिहिले की, जसे मला समजले की रेहमान यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तसे मी डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ते म्हणाले की ते लवकरच बरे होउन घरी परततील.
ए. आर. रहमान यांना लहानपणापासून संगीताची आवड होती. ४ वर्षांचे असताना त्यांनी पियानो वाजवायला सुरूवात केली होती. लहाणपणापासूनच ते अनेक इंन्स्ट्रुमेट्स वाजवू लागले होते. ए. आर. रहमान यांचे वडिल आर के शेखर हे तमिळ आणि मलायालम चित्रपटात म्युझिक कंपोजर होते. लहाणपणापासूनच रहमान आपल्या वडिलांना असिस्ट करत होते. अशाच प्रकारे त्यांनी आपल्या संगीत प्रवासाला सुरूवात केली. जेंव्हा ते ९ वर्षांचे झाले तेंव्हा त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले. तेंव्हा लहान वयात शिक्षणाबरोबरच त्यांना कुटुंबासाठी काम करावे लागले.
संगीतकार ए.आर. रहमान यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ऑस्कर व्यतिरिक्त, रहमान यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ग्रॅमी पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार यासह इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
" चिंता करण्यासारखे काहीही घडले नाही, त्याला केवळ डिहायड्रेशन आणि गॅस्ट्रिकची समस्या होती. तो आता ठीक आहे आणि लवकरच त्याला घरी नेले जाईल. ही फक्त गॅस्ट्रिकची समस्या आहे,"ए. आर. रैहाना