पुढारी ऑनलाईन :
बॉलीवूडचे दिग्गज संगीतकार आणि गायक एआर रहमान यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. एआर रहमान यांची प्रकृती अचानक बिघडली आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ए. आर. रहमान यांना शनिवारी रात्री चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
ए आर रहमान यांच्या छातीत दुखत असल्याची तक्रार त्यांनी डॉक्टरांकडे केली असल्याची माहिती मिळत आहे. ज्यानंतर त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांच्या प्रकृती विषयी अधिक माहिती मिळालेली नाही. मात्र त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांचे चाहते चिंतेत आहेत.
ए आर रहमान यांना लहानपणापासून संगीताची आवड होती. ४ वर्षांचे असताना त्यांनी पियानो वाजवायला सुरूवात केली होती. लहाणपणापासूनच ते अनेक इंन्स्ट्रुमेट्स वाजवू लागले होते.
एआर रहमान यांचे वडिल आर के शेखर हे तमिळ आणि मलायालम चित्रपटात म्युझिक कंपोजर होते. लहाणपणापासूनच रहमान आपल्या वडिलांना असिस्ट करत होते. अशाच प्रकारे त्यांनी आपल्या संगीत प्रवासाला सुरूवात केली. जेंव्हा ते ९ वर्षांचे झाले तेंव्हा त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले. तेंव्हा लहान वयात शिक्षणाबरोबरच त्यांना कुटुंबासाठी काम करावे लागले.
संगीतकार ए.आर. रहमान यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ऑस्कर व्यतिरिक्त, रहमान यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ग्रॅमी पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार यासह इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
" चिंता करण्यासारखे काहीही घडले नाही, त्याला केवळ डिहायड्रेशन आणि गॅस्ट्रिकची समस्या होती. तो आता ठीक आहे आणि लवकरच त्याला घरी नेले जाईल. ही फक्त गॅस्ट्रिकची समस्या आहे,"ए. आर. रैहाना