Apurva Nemalekar  pudhari photo
मनोरंजन

Apurva Nemalekar |'आयुष्याची दुसरी संधी..ज्यांनी प्रेम शोधलं..' अपुर्वाचा Wedding Album अखेर रिलीज, हळद ते मेहंदी सर्वकाही एकाच फ्रेममध्ये

Apurva Nemalekar | आयुष्याची दुसरी संधी... ज्यांनी प्रेम शोधलं अन्... अपुर्वाच्या लग्नाचा फुल व्हिडिओ अखेर रिलीज, हळद ते मेहंदी सर्वकाही एकाच फ्रेममध्ये

स्वालिया न. शिकलगार

मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या लग्नाचा संपूर्ण व्हिडिओ अखेर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये हळद, मेहंदी, कुटुंबीयांसोबतचे आनंदाचे क्षण आणि विवाहसोहळ्यातील खास आठवणी पाहायला मिळतात. “आयुष्याची दुसरी संधी” असे भावनिक कॅप्शन देत अपूर्वाने तिच्या नव्या आयुष्याच्या प्रवासाची झलक चाहत्यांसोबत शेअर केली असून चाहत्यांकडून तिला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अपूर्वाने तिच्या लग्नाची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता तिच्या विवाहसोहळ्याचा संपूर्ण व्हिडिओ अखेर प्रदर्शित करण्यात आला. तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अपूर्वाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिच्या लग्नाआधीच्या विविध कार्यक्रमांची सुंदर झलक पाहायला मिळते. हळद समारंभातील रंगतदार क्षण, मेहंदी सोहळ्यातील आनंद, कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबतचे भावूक क्षण तसेच विवाहसोहळ्याचा भव्य माहोल या सर्व गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये टिपण्यात आल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांना अपूर्वाच्या खास दिवसाचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे.

या व्हिडिओसोबत अपूर्वाने एक भावनिक संदेशही शेअर केला आहे. तिने कॅप्सनमध्ये म्हटलंय-अखेर! संपूर्ण व्हिडिओ आता यूट्यूबवर उपलब्ध आहे. दोन जीव – प्रत्येकाची स्वतःची अशी कहाणी, काही धडे आणि आयुष्याची दुसरी संधी... ज्यांनी प्रेम शोधलं आणि एकत्र एक सुंदर प्रवास निवडला. सादर करत आहोत आमच्या लग्नाचा टीझर – 'कायमच्या' सहजीवनाची ही एक नवी सुरुवात.

व्हिडिओमधील हळद समारंभ खासआहे. पारंपरिक पोशाखात सजलेली अपूर्वा आणि तिच्या जवळच्या व्यक्तींसोबतचे आनंदाचे क्षण तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. लग्नाच्या मुख्य सोहळ्यातील सुंदर सजावट, विधी आणि नवदाम्पत्यातील प्रेम यामुळे हा व्हिडिओ अधिक खास बनला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर होताच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. अनेकांनी अपूर्वाच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तर काहींनी तिच्या लग्नसोहळ्याचे कौतुक केले. हळद, मेहंदी, संगीत सेरेमनीमध्ये धमाल मस्ती या कपलने केलीय. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचा भाव त्यांच्यातील दृढ प्रेम सर्वकाही सांगून जात आहे.

अपूर्वा नेमळेकरने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. रात्रीस खेळ चाले मधून प्रचंड लकप्रिय झालेली अपुर्वा आता तिच्या आयुष्यातील या नव्या प्रवासालात आहे. अनेक महिन्यानंतर तिने तिच्या लग्नाचा व्हिडिओ अल्बम यु-ट्यूबवर शेअर केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT