Apurva Gore with husband and family  instagram
मनोरंजन

Apurva Gore |होणार सून मी ह्या घरची! अपुर्वा गोरेच्या घरी घुमणार सनई-चौघड्यांचे सूर, कुटुंबीयांचे फोटो व्हायरल, पती आहे तरी कोण?

Apurva Gore | होणार सून मी ह्या घरची! आई कुठे काय करते फेम अपुर्वाचे सासर-माहेरच्यांसोबतचे फोटो व्हायरल, होणारा पती आहे तरी कोण?

स्वालिया न. शिकलगार

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अपूर्वा गोरेचे सासर-माहेरच्यांसोबतचे काही खास फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी उत्सुकता वाढली आहे.

मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा गोरे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे तिची लोकप्रियता वाढली. अलीकडेच अपूर्वा गोरेचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती तिच्या माहेरच्या आणि सासरच्या कुटुंबीयांसोबत दिसत आहे. कौटुंबिक वातावरण, आनंदी चेहरे कॅमेराबद्ध झालेले आहेत. तिने सोशल मीडियावर हे पोटो पोस्ट केले आहेत.

फोटो पोस्ट करताना तिने लिहिले-आनंदघन येई घरा. Introducing you all गोरेंचा जावई- @j.anshuman & जोश्यांची सुन- apurvagore (yours truly) यावरून ती अंशुमन जोशीची आयुष्याची साथीदार बनणार असल्याचे कळते.

कोण आहे तिचा होणार पती?

अपूर्वाच्या होणाऱ्या पतीचे नाव अंशुमन जोशी आहे. तो अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, चिंतक, चित्रलेखक, छायाचित्रकार आहे. त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलमध्ये त्याने ही ओळख लिहिली आहे.

'शाळा' सिनेमा गाजवणारा अंशुमन जोशी याच्यासोबत अपूर्वा लग्नबंधनात अडकणार आहे. शाळा मध्ये विद्यार्थ्याच्या भूमिकेत अंशुमनला आता मोठा झालेला पाहून सर्वचजण चकीत झाले आहेत.

अपूर्वा विषयी थोडेसे ...

२०१८ मध्ये अपूर्वाने सोनी वाहिनीवरील 'ती फुलराणी' या मराठी मालिकेत काम केले. पुढे अपूर्वा स्टार प्रवाहवरील मराठी मालिका आई कुठे काय करते! मधून घराघरात पोहोचली. ईशाच्या भूमिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT