पुढारी ऑनलाईन डेस्क - 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत भावनिक वळण येत, जेव्हा अमोल इच्छा व्यक्त करतो की अप्पी आणि अर्जुनच लग्न त्याच्या शस्त्रक्रियेआधी त्याच्या डोळ्यासमोर व्हावं. अमोलच्या या इच्छेची पुर्तता करण्यासाठी अप्पी आणि अर्जुन लग्न करण्याचा निर्णय घेतात, ज्यामुळे वेळेची एक शर्यत सुरू होते. तयारी सुरू असताना, अमोलला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका पोहोचते.
मालिका अधिक रंगतदार होते, जेव्हा संकल्प अप्पीच्या खोलीत घुसून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, अप्पी धैर्याने त्याला रोखते आणि त्याला बाहेर हाकलून देते, पण त्यामुळे वेळ वाया जातो. तरीही, अमोल लग्न आधी व्हावे असा आग्रह धरतो. परिणामी, अप्पी आणि अर्जुन लग्नाचे वचन पूर्ण करतात, तर इकडे अमोल शस्त्रक्रियेची तयारी सुरु आहे.