'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत नवं ट्विस्ट पाहायला मिळणार Instagram
मनोरंजन

Appi Aamchi Collector | गंभीर आजारातून अमोल वाचणार?

अप्पी आमची कलेक्टर | गंभीर आजारातून अमोल वाचणार?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - प्रेम, जिद्द, आणि कुटुंब यातून सध्या अप्पी आमची कलेक्टर ही मालिका जात आहे. जिथे अप्पी आणि अर्जुनच्या लग्नाचा दिवशी नाट्यमय घडामोडी घडताना दिसतात. पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकण्याची तयारी करत असताना, या दोघांना पुन्हा एकदा संकटाचा सामना करावा लागतो. अमोलची गंभीर शस्त्रक्रिया होत असताना ते अमोलच्या सोबत राहण्याचा निर्धार करतात. तर हॉस्पिटलमध्ये जात असताना संकल्प समोर आल्याने संकल्पचे भयानक मनसुबे उघडकीस येतात. त्याने अमोलच्या वैद्यकीय अहवालात फेरफार करून त्याच्या जीवाला धोका निर्माण केला आहे.

या तीव्र संघर्षात अर्जुन निश्चित करतो की संकल्पला कायद्याच्या कचाट्यात अडकवायचं. या गोंधळाच्या वातावरणात, अप्पी आणि अर्जुनचे लग्न आणि अमोलची शस्त्रक्रिया एकाच वेळी सुरू आहे. मात्र, त्यांच्या लग्न लागायच्यावेळी अमोलच्या हृदयाचा ठोका थांबतो.

एका हृदयस्पर्शी क्षणात, एक चमत्कारच आहे जो अमोलला बरं करू शकतो. ज्यामुळे संपूर्ण कुटुंब आनंदात आहे. ह्या हृदयस्पर्शी वळणावर जिथे अमोल नवविवाहित अप्पी आणि अर्जुनसाठी भव्य गृहप्रवेशाचा समारंभ आयोजित करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT