IIFM 2024
'बर्लिन' चा IIFM 2024 मध्ये होणार प्रीमियर आहे Instagram
मनोरंजन

IFFM 2024 | अपारशक्ती खुराणा स्टारर 'बर्लिन' चा IIFM 2024 मध्ये होणार प्रीमियर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अपारशक्ती खुरानाचा आगामी चित्रपट 'बर्लिन' हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा मेलबर्नच्या प्रतिष्ठित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या १५ व्या आवृत्तीत ऑस्ट्रेलियन प्रीमियर होणार आहे. (IFFM 2024)

अपारशक्ती खुरानाचा बर्लिन भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मेलबर्न २०२४ मध्ये प्रीमियर होणार आहे

इन्स्टाग्रामवर ही खास गोष्ट शेअर करताना अपारशक्तीने लिहिले आहे- #बर्लिनचा थरारक प्रवास सुरूच आहे! प्रतिष्ठित @iffmelbourne ✨#IndianFilmFestivalOfMelbourne च्या १५ व्या आवृत्तीत हा चित्रपट ऑस्ट्रेलियन प्रीमियरसाठी सज्ज आहे!

हे आहेत बर्लिन' चे कलाकार

बर्लिन' एका मूकबधिर तरुणाची कथा सांगणार आहे, ज्याला गुप्तहेर म्हणून ब्युरोने अटक केली आहे. अतुल सभरवाल दिग्दर्शित या चित्रपटात इश्वाक सिंग, राहुल बोस आणि कबीर बेदी यांच्याही भूमिका आहेत.

अपारशक्ती खुराना 'स्त्री २' मध्येही दिसणार

'बर्लिन' व्यतिरिक्त अपारशक्ती खुराना 'स्त्री २' मध्ये दिसणार आहे ज्यामध्ये तो त्याच्या प्रेक्षकांची आवडती भूमिका 'बिट्टू' पुन्हा साकारताना दिसेल. तो सध्या लंडनमध्ये 'बदतमीज गिल'साठी शूटिंग करत आहे ज्यामध्ये तो परेश रावल आणि वाणी कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करत आहे. याशिवाय त्यांच्याकडे 'फाइंडिंग राम' नावाचा डॉक्युमेंट्रीही आहे.

SCROLL FOR NEXT