'अंतरपाट' मालिकेत जान्हवी गौतमीलाच बांधणार राखी बांधणार आहे Instagram
मनोरंजन

Antarpaat | 'अंतरपाट' मालिकेत साजरे होणार आगळेवेगळे 'रक्षाबंधन'

'अंतरपाट' मालिकेत जान्हवी गौतमीलाच बांधणार राखी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'कलर्स मराठी'वरील 'अंतरपाट' मालिकेत आगळेवेगळे 'रक्षाबंधन' साजरे झालेले पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या 'रक्षाबंधन' विशेष भागात जान्हवी गौतमीला राखी बांधणार आहे. हा रक्षाबंधन विशेष भाग प्रेक्षकांना येत्या १७ ऑगस्टला म्हणेजच आज अंतरपाट’. मालिकेत साडेसात वाजता बघायला मिळणार आहे. (Antarpaat tv serial)

'अंतरपाट' या मालिकेत नुकतेच गौतमीने आपल्या जीवावर उधार होऊन जान्हवीला मुंबईहून सुखरुप कोकणात आणलं आहे. तसेच तिला आश्रयदेखील दिला आहे. गौतमीने जान्हवीचं एका भावाप्रमाणे रक्षण करत तिचा जीवदेखील वाचवला आहे. जो आपले रक्षण करतो त्याला आपण रक्षाबंधनाला राखी बांधत असतो. याप्रमाणेच जान्हवीसाठी आपली रक्षणकर्ती गौतमी असल्याने ती तिलाच राखी बांधताना दिसणार आहे.

'अंतरपाट' मालिकेत सध्या क्षितिज आणि गौतमीची मैत्री फुलताना दिसत आहे. घरच्यांनी त्यांच्या संसाराचा घाट घातल्याने त्यांनी सुखी संसाराचे नाटक काही दिवस सुरूच ठेवण्याचे ठरवले आहे. अशातच मालिकेत अनेक रंजक वळणे येणार आहेत. क्षितिज गौतमीमध्ये गुंतत चालल्याचं जान्हवीला जाणवते. त्यामुळे गौतमीला सर्व काही खरे सांगून तिच्या आयुष्यातून कायमच निघून जाण्याचा निर्णय जान्हवीने घेतला आहे.

रक्षाबंधन विशेष भागाबद्दल बोलताना गौतमी उर्फ रश्मी अनपट म्हणाली, "आजपर्यंत रक्षाबंधन म्हटलं की, बहिणीने भावाला राखी बांधणं, ओवाळणं हेच मी करत आली आहे. पण जेव्हा जान्हवी मला म्हणाली की, आज मला तुम्हाला राखी बांधायची आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मला वाटतं, रक्षाबंधन हे फक्त भाऊ आणि बहिण या नात्यापुरतं मर्यादित न राहता दोन बहिणीदेखील रक्षाबंधन साजरं करू शकतात. राखी बांधण्यामागे आपल्या भावाने आयुष्यभर आपली काळजी घ्यावी, हिच भावना असते. आता जान्हवीने मला राखी बांधण्यामागेदेखील हाच विचार आहे. त्यामुळे आता जान्हवीच्या प्रत्येक सुख-दु:खात मी सहभागी आहे".

जान्हवीच्या भूमिकेत दिसणारी प्रतीक्षा शिवणकर म्हणाली,"मालिकेत जान्हवीने गौतमीला राखी बांधली आहे. दरवर्षी आपण आपल्या भावाला राखी बांधत असतो. पण या मालिकेत अतिशय सुंदरपणे ही भावना दाखवली आहे. जान्हवीला गौतमी आपल्या भावाच्या दर्जाची वाटतेय. त्यामुळेच जान्हवी गौतमीला राखी बांधतेय. जान्हवी एकटी आहे. तिच्या आयुष्यात फक्त तिचे वडील आहेत. या सगळ्या एकटेपणात वाढलेल्या जान्हवीला आता गौतमीमुळे बहिण, भाऊ, आई-वडील, भाची अशी अनेक नाती मिळाली आहेत. त्यामुळे पारकर कुटुंब हे तिच्या कुटुंबासारखचं आहे. ज्या गोष्टी एका भावाने तिच्यासाठी करायला हव्यात, त्या गोष्टी गौतमीने तिच्यासाठी केल्या आहेत. त्यामुळे ती तिला राखी बांधतेय... यामाध्यमातून प्रेक्षकांपर्यंत एक चांगला संदेश पोहोचेल. वैयक्तिक आयुष्यातही मला सख्खा भाऊ नसल्याने मी बहिणीला किंवा बहिण मला राखी बांधते. आता मालिकेच्या माध्यमातून गौतमीला राखी बांधल्याचा आनंद आहे".

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT