कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर तिच्या आयुष्यातील प्रत्येक छोटी मोठी अपडेट चाहत्यांशी शेयर करत असते. आताही तिने एक आनंदाची बातमी चाहत्यांशी शेयर केली आहे. अंकिता आता निर्माती बनणार आहे. तिने आणि तिच्या पतीने एक प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आहे. (Latest Entertainment News)
यावेळी शेयर केलेल्या पोस्टबाबत ती म्हणते. प्रत्येक मोठ्या स्वप्नाला लागतो शुभारंभाचा क्षण…आणि तो क्षण आम्हाला मिळतोय आज, दसऱ्याच्या या मंगलदिनी मी आणि कुणाल @kunalbhagatofficial आमचं स्वतःचं Production House सुरू करत आहोत. दोन क्रिएटिव्ह डोकी एकत्र आली की भन्नाट काहीतरी घडणार हे नक्की!
Mud Eye Studios या नावाचा अर्थ
Mud (माती) – माती म्हणजे मूळ, आधार, नैसर्गिकता, क्रिएटिव्हिटीचा उगम.
Eye (डोळा) – डोळा म्हणजे दृष्टी, दृष्टिकोन, निरीक्षण आणि कला पाहण्याची नजर.’
अर्थात अंकीताने तिचा नव्या प्रॉडक्शनमार्फत कोणता नवा सिनेमा किंवा इतर कोणता नवीन प्रोजेक्ट सुरू करणार हे आताच शेयर केले नसले तरी तिच्या नव्या इनिंगबाबत चाहते उत्साहित आहेत.
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अंकीताने बॉयफ्रेंड कुणालोबत लग्नगाठ बांधली.