Tripti Dimri 
मनोरंजन

गॉर्जियस…, अॅनिमल फेम तृप्ती डिमरी ब्लॅक बिकिनीत समुद्रकिनारी

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'ॲनिमल' फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी तिच्या अभिनयासोबत एका पेक्षा एक हॉट लूकनं चर्चेत आली आहे. सध्या तृप्ती इटलीत सुट्यांचा आनंद घेत आहे. यावेळचे तिने संमुद्रकिनाऱ्यावरील बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंतून तृप्तीनं कर्वी फिगर मेन्टेड केली आहे.

अभिनेत्री तृप्ती डिमरीने नुककतेच तिच्या इन्स्टाग्रामवर ब्लॅक आणि ग्रीन बिकिनीतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तृप्तीने कधी समुद्राच्या पाण्यात तर कधी वाळूत बसलेली दिसतेय. याशिवाय तृप्ती बिकिनीवर टॉवेल गुंडाळून पायऱ्या उतरतानाही दिसत आहे. यावेळी तिच्या डोळ्यावर चष्मा आणि डोक्यावरील टोपीने सर्वाचे लक्ष वेधून घेतंलय. तृप्ती समुद्र किनाऱ्यावर तिची कर्वी फिगर फ्लाँट केली आहे.

'Happy as a 🐚', 'Golden Glitter ☀️🌸' आणि 'Here's to looking at you Italy 🥂😍'. असे तिने फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. तृप्तीने इटलीचा सुंदर नजरा दाखविताना एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यात कती ब्लॅक- व्हाईट वनपीसमध्ये दिसतेय. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच बॉलिवूड स्टार्ससोबत अनेक चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस्‌ केल्या आहेत.

तृप्तीचा बॉयफ्रेंड सॅम मर्चंटही स्वतःला कमेंट करण्यापासून रोखू शकला नाही. तृप्तीच्या या पोस्टवर कॉमेंट करताना त्यांनी लिहिले आहे की 'Gorgeous' याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी हार्ट आण फायरचे ईमोजी शेअर केलेत. या फोटोला आतापर्यत ७ लाख ८४ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT