मनोरंजन

आणि अनिल कपूरला जॅकी श्रॉफने १७ वेळा लगावली होती थोबाडीत! 

Pudhari News

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सिनेमाजगतात ज्यांच्या मैत्रीचे किस्से सांगितले जातात, ते मित्र म्हणजे, अनिल कपूर (happy birthday anil kapoor) आणि जॅकी श्रॉफ. अनिल आणि जॅकीने एकत्र अनेक चित्रपट केले आहेत. यामध्ये 'राम-लखन', 'त्रिमूर्ति', 'युद्ध', 'अंदाज अपना', 'रूप की रानी चोरों का राजा' आणि 'कभी ना कभी' यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. दोघांनाही सिनेइंडस्ट्रीच अनेक वर्षे झाली आहेत. काही महिन्यांपूर्वी निर्माते विधु विनोद चोप्रा यांनी अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांचे ३० वर्षापूर्वीचे एक रहस्य उलगडले होते. आज (दि. २४) अनिल कपूर यांच्या ६४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया, त्याच्याविषयी या खास गोष्टी. 

विधू विनोद चोप्रा यांनी हे रहस्य सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून उलगडले होते. या व्हिडिओमध्ये विधुशिवाय, अनुराग कश्यप, अनिल आणि जॅकीदेखील दिसत आहे. व्हिडिओमध्ये अनिल आणि जॅकी आपला चित्रपट 'परिंदा' विषयी सांगताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना विधु विनोद चोप्रा यांनी लिहिले आहे-'अनिल कपूर नेहमीचे आपल्या कामाशी प्रामाणिक राहतो. जेव्हा उत्तम शॉटची गोष्ट होती, तेव्हा एका परफेक्ट शॉटसाठी अनिल कपूरने १७ रिटेक घेतले होते.'

या व्हिडिओमध्ये 'परिंदा' चित्रपटाचा एक सीन दाखवण्यात आला आहे. या सीनमध्ये अनिल कपूर आणि जॅकी यांच्यात भांडण होते. मग, रागाच्या भरात जॅकी अनिलला जोरात कानशिलात लगावली होती. या सीनविषयी जॅकी व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहेत. जॅकी म्हणतात की-'पहिला शॉट ठीक झाला होता आणि चेहऱ्यावरील भावदेखील एकदम ठीक मिळाले होते. परंतु,  अनिलला ते दु:ख सीनमध्ये दाखवायचं होतं की, त्याच्या मोठ्या भावाने त्याला कानाखाली मारली आहे. काही केल्‍या हा सीन परफेक्‍ट होत नव्‍हता. तेव्‍हा दिग्‍दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी या सीनचे जवळपास १७ रिटेक घेतले. तितक्‍या वेळा मी अनिल कपूरला कानशिलात लगावली होती.' 

'परिंदा' ३ नोव्हेंबर, १९८९ रोजी रिलीज झाला होता. परिंदामध्ये जॅकी आणि अनिल कपूर यांच्याशिवाय, नाना पाटेकर, माधुरी दीक्षित आणि अनुपम खेर यांच्याही भूमिका होत्या. 

SCROLL FOR NEXT