Bollywood Actress Shravan Pudhari photo
मनोरंजन

Bollywood Actress Shravan|ॐ नमः पार्वती पतये, हर हर महादेव! अनन्या 'भीमाशंकर'च्या चरणी तर नियानेही घेतले दर्शन, निम्रत कौर 'गंगेश्वर' दर्शनाला

Bhimashankar Jyotirlinga | अनन्या पांडेने भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे घेतले दर्शन, निमरत कौर पोहोचली गंगेश्वर मंदिरात

पुढारी वृत्तसेवा

श्रावण शिवरात्रीच्या निमित्ताने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी भगवान शिव प्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. अभिनेत्री अनन्या पांडेने पुण्याजवळील भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे जाऊन दर्शन घेतले. तर निमरत कौरने समुद्रकिनारी असलेल्या प्रसिद्ध गंगेश्वर महादेव मंदिरात जाऊन भगवान महादेवाचा आशीर्वाद घेतला. या मंदिरातील पाच शिवलिंगांचा संबंध महाभारत काळातील पांडवांशी असल्याचे सांगितले जाते.

श्रावण शिवरात्रीच्या पवित्र दिवशी अनेक टीव्ही आणि बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत महादेवाप्रती आपली भक्ती व्यक्त केली. काही कलाकारांनी चाहत्यांना शिवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या. यामध्ये टीव्ही अभिनेत्री निया शर्माने देखील महादेवाचे दर्शन घेतले.

अनन्या पांडे

अनन्या पांडेने भीमाशंकर ज्योतिर्लिंगचे तर दुसरीकडे निमरत कौरने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. निम्रतने या फोटोंमध्ये त्या दीवपासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर फुदम गावातील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या गंगेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेताना दिसत आहेत. यावेळी तिने पारंपरिक पोशाख परिधान केला होता.

अनन्याने मंदिरात पूजा केल्यानंतर दर्शनाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. फोटोंमध्ये ती शिवलिंगसमोर हात जोडून प्रार्थना करताना दिसते. पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय- ‘ओम नमः पार्वती पतये, हर हर महादेव! भीमाशंकर ज्योतिर्लिंग’. तिच्या या पोस्टवर कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींनीही प्रतिक्रिया दिल्या. अनन्याची आई भावना पांडेने ‘ओम नमः शिवाय’ असे लिहित हात जोडणारा इमोजी शेअर केला.

भीमाशंकर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक

भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाच्या १२ प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये हे मंदिर वसले आहे. धार्मिक महत्त्वासोबतच भीमाशंकर परिसर वन्यजीव अभयारण्यासाठीही ओळखला जातो. पिवळ्या रंगाच्या साध्या पारंपरिक पोशाखात ती दिसली. अनन्याने पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसली. आपल्या कामासोबतच वैयक्तिक आयुष्यातील अनेक क्षणही तिने चाहत्यांसोबत शेअर केलेत.

निमरत कौरने घेतले गंगेश्वर महादेव मंदिरात दर्शन

निमरत कौर गंगेश्वर महादेव मंदिरात प्रार्थना करताना दिसली. हे मंदिर दीव शहरापासून जवळच फुदम गावात अरबी समुद्राच्या किनारी वसलेले आहे. निमरतने फोटो शेअर करत लिहिले की, महादेवाचा दिव्य आशीर्वाद सर्वांच्या अडचणी दूर करो आणि प्रत्येकाला आतून बळ मिळो. तसेच त्यांनी सर्वांना श्रावण शिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

गंगेश्वर महादेव मंदिर हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेले प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे समुद्राच्या लाटा खडकांमध्ये असलेल्या पाच शिवलिंगांवर नैसर्गिकरित्या जलाभिषेक करतात. धार्मिक मान्यतेनुसार, महाभारत काळात अज्ञातवासात असताना पांडवांनी ही पाच शिवलिंगे स्थापित केली होती. खडकांवर असलेली ही शिवलिंगे आकाराने वेगवेगळी आहेत.

निया शर्मा

निया शर्माने इन्स्टाग्रामवर लिहिलं- ''हॅप्पी सावन की शिवरात्री! ओम नम: शिवाय. आईने सांगितलं आहे की, श्रावणाचे ४ सोमवार मंदिर जायचं तर जायचचं.''

भूमी पेडणेकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT