Kim Kardashian at anant ambani wedding
किम - नीता अंबानी सोबत लग्न मंडपात पोहोचल्या  Kim Kardashian Instagram
मनोरंजन

Anant-Radhika Wed : नीता अंबानींच्या हातात हात घालून किम कर्दाशियन पोहोचली मंडपात

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनंत अंबानी - राधिका मर्चेंट यांच्या लग्नात बॉलीवूड ते हॉलीवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली. या सोहळ्यात किम कार्दशियन, जॉन सीना, रेमा यासारख्या अनेक हॉलीवूड सिलेब्रिटीजने चारचाँद लावले. दरम्यान, किम कार्दशियन देशी अंदाजात मंडपात पोहोचली. विशेष म्हणजे, नीता अंबानी यांच्या हाती हात देऊन ती लग्नविधी स्थळी पोहोचली. यावेळचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पहिल्यांदा भारतात आली किम कार्दशियन

हॉलीवूड सेलेब्रिटी किम कार्दशियन अंबानी परिवाराच्या ल्गानत देशी अंदाजात दिसली. तिने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. इंडियन सिलेब्रिटीज प्रमाणे तिनेही इंडियन आऊटफिट निवडले. ती स्वत:ला या लूकमध्ये न्याहाळत राहिली. तिच्या एका झलकने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कॉमेंट्स वर्षाव केलाय.

स्वत:ला न्याहाळत राहिली किम कार्दशियन..

किमनेदेखील आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्नाचे काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती लाल लहेंग्यात दिसत आहे. ती आरशामध्ये स्वत: ला न्याहाळत राहिली. कधी ती कॅमेरात आपल्या गळ्यातील हिऱ्यांचा हार तर कधी आपले नेलपेंट कॅप्चर करत राहिली.

किम तिची बहिण ख्वोले सोबत दिसत आहे

video-viral bhayani instagram वरून साभार

SCROLL FOR NEXT