Amitabh Bachchan health updates  
मनोरंजन

Amitabh Bachchan : 'घरी परतल्यानंतर सर्वात कठीण काळ', अमिताभ यांची प्रकृतीबाबत मोठी माहिती; शस्त्रक्रियेनंतर ICU मध्ये उपचार

Amitabh Bachchan hospitalised: 'घरी परतल्यानंतरचा काळ हा सर्वात कठीण टप्पा', अमिताभ यांची प्रकृतीबाबत मोठी माहिती; शस्त्रक्रियेनंतर ICU मध्ये उपचार

पुढारी वृत्तसेवा

Amitabh Bachchan health updates

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अलीकडेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि काही काळ अतिदक्षता विभागात (ICU) डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते, अशी माहिती त्यांनी स्वतः त्यांच्या ब्लॉगमधून दिली आहे.

रुग्णालयातून घरी परतल्यानंतरच्या काळाबद्दल बोलताना अमिताभ बच्चन यांनी हा टप्पा सर्वात कठीण असल्याचे म्हटले आहे. त्यांनी शस्त्रक्रियेचे कारण स्पष्ट केले नसले, तरी शारीरिक आणि मानसिक संघर्षाविषयी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

घरी परतल्यानंतरचा काळ सर्वाधिक आव्हानात्मक

आपल्या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर ICU मध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि ते घरी परतले.

पुढे त्यांनी नमूद केले की, "घरी परतल्यानंतरचा काळ हा सर्वात कठीण टप्पा असतो. शारीरिक, मानसिक आणि दैनंदिन आयुष्याच्या दृष्टीनेही हा काळ मोठे आव्हान घेऊन येतो."

शस्त्रक्रियेचे कारण अद्याप समोर नाही

अमिताभ बच्चन यांनी नेमकी कोणती शस्त्रक्रिया झाली किंवा त्यामागील काय कारण काय होते, याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र, ICU मध्ये काही काळ उपचार घेतल्यानंतर ते आता घरी असून प्रकृती सुधारत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ब्लॉगमधील या भावनिक पोस्टनंतर अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT