Amitabh Bachchan covers his house Jalsa with plastic sheets
मुंबई - मुंबईत संततधार सुरुच आहे. दुसरीकडे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या १०० कोटींच्या बंगल्याला पावसापासून संरक्षणासाठी देसी जुगाड करण्यात आला. जुगाडचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यावर सोशल मीडिया युजर्स प्रतिक्रियांचा पाऊस पाडत आहेत.
अमिताभ बच्चन मुंबईमध्ये आपल्या परिवारासोबत 'जलसा'मध्ये राहतात. सूत्रांनुसार, या बंगल्याची किंमत १०० कोटी रुपये आहे. पण सध्या संततधारमुळे या बंगल्यावर देसी जुगाड पाहायला मिळला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये बिग बींचे घर पूर्णपणे प्लास्टिक शीटने झाकण्यात आले आहे. पावसापासून संरक्षणासाठी हे कव्हर करण्यात आले आहे. पण त्यानंतर युजर्स कॉमेंट्स देत आहेत.
एका युजरने लिहिलं, 'प्लास्टिक ही रोके पानी, झोपडा हो या अंबानी.' दुसऱ्या युजरने म्हटलं, 'चाहे कितने अमीर हों, लेकिन बारिश से बचने के लिए ये देसी जुगाड सबके पास है.' आणखी एकाने लिहिलं, 'क्या वो पेंट को बचाने के लिए ऐसा करते हैं?'
अमिताभ बच्चन सध्या सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहेत. अभिषेक बच्चनचा चित्रपट 'कालीधर लापता'ला प्रमोट करत आहेत.
दरम्यान, कालीधर लापता नंतर अभिषेक बच्चनच्या हाती आणखी एक चित्रपट लागला आहे. यामध्ये तो गंभीर भूमिकेत दिसेल. वृत्तानुसार, तो संदीप रेड्डी वांगाचे असिस्टेंट डायरेक्टर शंमुखा गौतम सोबत नवा ॲक्शन चित्रपट करणार आहे.