रवीना टंडनची लेक राशा 'या' चित्रपटातून डेब्यू करणार आहेत instagram
मनोरंजन

‘आजाद’मधून डेब्यू करताहेत अमन देवगन-राशा टंडन

Rasha Thadani-Aaman Devgan | रवीना टंडनची लेक राशा 'या' चित्रपटातून करणार डेब्यू

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - चित्रपट जगतात एकापेक्षा एक यशस्वी चित्रपट देणारी अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी डेब्यूसाठी तयार आहे. राशा आणि अजय देवगनचा भाचा अमन देवगन दिसणार आहे. बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री म्हणून रवीना टंडनला ओळखले जाते. तिची मुलगी राशा थडानी अभिषेक कपूर दिग्दर्शित आगामी ‘आजाद’ चित्रपटात दिसणार आहे. (Rasha Thadani-Aaman Devgan)

या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केले आहे. अभिषेक कपूर एक यशस्वी दिग्दर्शक मानले जातात त्यांनी मनोरंजन जगतात ‘रॉकऑन’, ‘केदारनाथ’ आणि ‘चंडीगढ़ करे आशिकी’ यासारखे चित्रपट दिले आहेत. निर्मात्यांनी बुधवारी आगामी चित्रपटाच्या टायटलचा खुलासा करत एक झलक दाखवली होती. चित्रपटाचे टीजर या दिवाळीत चित्रपटगृहात 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' सोबत रिलीज केले जाईल. राशा - अमनची पहिली झलक १ नोव्हेंबर रोजी पाहू शकाल. (Rasha Thadani-Aaman Devgan)

रॉनी स्क्रूवाला - प्रज्ञा कपूर निर्मित 'आजाद' मनोरंजनाने भरपूर आहे. पुढील वर्षी जानेवारी (२०२५) मध्ये मोठ्या पडद्यावर रिलीज होईल. 'चंडीगढ़ करे आशिकी' नंतर अभिषेक यांचा हा पहिला चित्रपट आहे. अभिषेक यांनी म्युझिकल ड्रामा 'रॉकऑन' मधून मोठे यश मिळवले. या चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर - प्राची देसाईने अर्जुन रामपालसोबत मुख्य भूमिका साकारल्या होत्या. रिलीजनंतर चित्रपट समीक्षकांनी खूप कौतुक केले होते.

अभिषेक कपूर यांनी २०१३ मध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत, राजकुमार राव, अमित साध, अमृता पुरी स्टारर चित्रपट ‘काई पो छे’ लिहिली होती. दिग्दर्शनही त्यांचेच होते. हा चित्रपट चेतन भगत यांची कादंबरी ‘द 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ (२००८) वर आधारित होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT