पुढारी ऑनलाईन डेस्क - तुरुंगातून सुटका झाल्यानंतर अल्लू अर्जुनची पत्नी घराबाहेर प्रतीक्षा करत उभी होती. यावेळचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अल्लू घरी पोहोचताच ती भावूक झाली. अल्लू अर्जुनला ती बिलगून रडली. यावेळी त्यांची मुलेदेखील तिथे उपस्थित होती.
अभिनेता विजय देवरकोंडाने अल्लू अर्जुन तुरुंगातून घरी परतल्यानंतर हैदराबादमध्ये जुबली हिल्स येथील त्याच्या निवासस्थावी भेट घेतली. यावेळचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
विजय देवरकोंडानंतर चिंरजीवीची पत्नी सुरेखा यांनी अल्लू अर्जुनची भेट घेतली. सोबतच अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंदशी देखील सुरेखा यांनी बातचीत केली.
विजय देवरकोंडा शिवाय अल्लू अर्जुनला भेटण्यासाठी नागा चैतन्य आणि राणा दग्गुबाती देखील पोहोचले. अल्लू अर्जुनचे ते दोघे चांगले मित्र आहेत.