पुढारी ऑनलाईन डेस्क - पुष्पा -२ स्टार अल्लू अर्जुन तुरुंगातून (हैदराबाद, तेलंगणा) बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पांढऱ्या टी-शर्ट मध्ये तो यावेळी दिसला. त्याने सर्वांचे आभार मानले आणि झालेल्या दुर्घटनेबद्दल शोकदेखील व्यक्त केला. (Allu Arjun Bail)
अभिनेता अल्लू अर्जुन म्हणाला, "मी प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. मला माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानायचे आहेत. काळजी करण्यासारखे काही नाही. मी ठीक आहे. मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे आणि मी सहकार्य करेन. ही दुर्दैवी घटना घडली त्याबद्दल मी पुन्हा एकदा शोक व्यक्त करू इच्छितो..." (AlluArjunArrest)
तेलंगणा कोर्टाने काल १३ डिसेंबर रोजी त्याला चार आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज (दि. १४ डिसेंबर) रोजी सकाळी ६.४० च्या सुमारास त्याची तुरूंगातून सुटका झाली. अल्लू अर्जुनला पोलिसांनी हैदराबादमधून शुक्रवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी त्याला घरातून अटक केली होती. (Allu Arjun Bail)
रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनने दावा केला की, पोलिसांनी त्याला नाश्ता देखील खाऊ दिला नाही. त्याला थेट बेडरुममधून अटक केली. यावेळी त्याने टी-शर्ट बदलल्याचे म्हटले जात आहे. त्याने घातलेल्या हुडीवर 'फ्लॉवर नही..फायर हू मैं' असे लिहिले होते.
अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी संध्या थिएटर केसमध्ये अटक केल्यानंतर त्याला चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान, हे वृत्त समजल्यानंतर अल्लूची पत्नी स्नेहा आणि मुलांना भेटण्यासाठी मेगास्टार चिरंजीवी आपल्या पत्नीसमवेत त्याच्या घरी पोहोचले. चिरंजीवीने शूटिंग थांबवले. यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
कंगना म्हणाल्या-हे खूप वाईट आहे..असं घडायला नको होतं.. मी अल्लू अर्जुनचे समर्थन करते. त्यांना जामीन मिळाला आहे. पण, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही हायप्रोफाईल आहात तर हे सर्व होणं योग्य आहे. .. मला वाटतं की, थिएटर्समध्ये प्रोटोकॉल्स असायला पाहिजेत, जिथे सुरक्षेसाठी खास लक्ष देणे गरजेचे आहे...
जर चुकी असेल तर अटक व्हायला हवी. माझ्यामुळे घटना होत असेल तर अटक व्हायला हवी. नसेल तर अटक होऊ नये
रश्मिका मंदानाने एक्स अकाऊंटवर ट्विट करून म्हटलं की, 'मला विश्वा होत नाहीये की, मी हे काय पाहत आहे. जी घटना झाली ती खूप वाईट होती. पण, हेदेखील पाहायला हवं की, एकाच व्यक्तीवर आरोप केला जात आहे. ही परिस्थिती खूप वाईट आहे.