पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेता अल्लू अर्जुनची आज सकाळी पावणे सातच्या दरम्यान तुरुंगातून सुटका झाली. (हैदराबाद) तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवाय अन्य काही माध्यमांशी चर्चा केली. तो म्हणाला, “...आम्ही त्या कुटुंबाप्रती खूप दु:खी आहे. मी वैयक्तिकरित्या त्यांना शक्य होईल त्या मार्गाने मदत करीन. मी माझ्या कुटुंबासह चित्रपटगृहात चित्रपट पाहत होतो आणि बाहेर अपघात झाला. त्याचा माझ्याशी थेट संबंध नाही. हे आकस्मिकरित्या घडले होते...मी गेल्या २० वर्षांपासून एकाच थिएटरमध्ये जात आहे आणि मी ३० पेक्षा जास्त वेळा एकाच ठिकाणी गेलो आहे. यापूर्वी कधीही असा अपघात झाला नव्हता. मी माझ्या टिप्पण्या राखून ठेवल्या पाहिजेत, असे मला वाचे. आता काहीही बोलायचे नाही…”