अल्लू अर्जुन x account
मनोरंजन

अल्लू अर्जुनला मोठा दिलासा! संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी नियमित जामीन मंजूर

Allu Arjun Bail : नामपल्ली कोर्टाचा निर्णय

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : हैदराबादच्या संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी सुपरस्टार अल्लू अर्जुनला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात नामपल्ली कोर्टाने अल्लू अर्जुनला नियमित जामीन मंजूर केला आहे.

अल्लू अर्जुनवर कोणते आरोप?

4 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुन प्रीमियर शो साठी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये दाखल झाला होता. त्यावेळी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या लाठीचार्जमुळे आणि आवश्यक व्यवस्थेच्या अभावामुळे एका महिलेचा चेंगरून मृत्यू झाला. तर त्या महिलेचा मुलगा यामध्ये जखमी झाला, असा आरोप करण्यात आला असल्याचे या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

अल्लू अर्जुनला हैदराबादमधून अटक

'पुष्पा 2' च्या प्रिमियरवेळी झालेल्या चेंगराचेगरीप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबादमधून अटक करण्यात आली होती. हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' चित्रपटाच्या प्रीमियरवेळी म्हणजे, ४ डिसेंबर रोजी चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये एका ३५ वर्षीय महिलेचा (एम रेवती) मृत्यू झाला. या घटनेनंतर अल्लू अर्जुनने दुख: व्यक्त केले होते. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाला ज्यात त्याने घडलेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला होता.

‘दुर्दैवाने उपस्थित होतो’

अल्लू अर्जुनने या घटनेनंतर तेलंगणा उच्च न्यायालयात खटला दाखल केला. त्याने म्हटलं होते की, या घटनेत आपली कोणतीही चूक नाही. त्यावेळी मी दुर्दैवाने तिथे उपस्थित होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT