मुंबई : पुढारी ऑनलाईन
आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी चित्रपट चर्चेत आहे. दरम्यान, रणाबीर कपूरला कोरोना झाला. त्यामुळे आलियाला देखील कोरोनाची चाचणी करून घ्यावी लागली. तिची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. रणबीर कपूर सध्या घरामध्ये क्वारंटाईन आहे. आलिया रणबीर कपूरपासून दूर असल्याने तिला आपल्या बॉयफ्रेंडची आठवण येत आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून ती रणबीरला खूप मिस करत असल्याचे दिसत आहे. चित्रपटात तिच्याशिवाय संजय लीला भन्साळींची मुख्य भूमिका आहे. भन्साळीदेखील काही दिवसांपूर्वी कोरोना बाधित होते.
आलियाची कोरोना निगेटिव्ह
आलियाने सोशल मीडियावर नोट लिहिली होती की, 'मी आपल्या सर्वांचे मेसेजे वाचत होते. माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी डॉक्टरांशी बोलले. आता मी काम करत आहे. आपले आभार. काळजी घ्या. सुरक्षित राहा.' आलिया भट्ट 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटात दिसणार आहे.
मंदिरात जाऊन घेतले दर्शन
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने मुंबईत महाशिवरात्रीच्या औचित्याने मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी तिच्यासोबत चित्रपट निर्माते अयान मुखर्जी होते. यावेळी आलियाने रणबीरची प्रकृती ठिक व्हावी, यासाठी प्रार्थना केल्याचे म्हटले जात आहे. आलियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये आलिया भट्ट रणबीर कपूरचा हात पकडल्याचे दिसत आहे. फोटो शेअर करत आलिया भट्टने लिहिलंय, 'मी खूप अधिक मिस करत आहे.'
वाचा – आणि शिल्पा शेट्टीने स्वत:च्या हेअर स्टायलिस्टला लगावली कानशिलात! (video)
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या ब्रह्मास्त्रचे डबिंग करत आहेत. परंतु, रणबीर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चित्रपटाचे शूटिंग थांबवले आहे. याआधी रणबीर कपूरची आई आणि अभिनेत्री नीतू कपूरने रणबीर कपूरच्या प्रकृतीची माहिती देत म्हटले होते की, तिचा मुलगा रणबीर कोरोना बाधित आहे आणि तो घरी क्वारंटाईन आहे. नीतू यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, 'आपण काळजीने विचारपूस केली, यासाठी आपल्या सर्वांचे धन्यवाद. रणबीर कपूरची कोरोना चाचणी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्याला औषधे सुरू आहेत. तो आता बरा होत आहे आणि घरीच आहे. सर्व नियम पाळत आहे आणि क्वारंटाईनमध्ये आहे.'