रणबीर कपूर याची बहीण रिद्धिमा कपूर साहनी अभिनयात नसली तरी नेहमीच चर्चेत असते. तिने नुकतेच रियालिटी सीरिज फॅब्युलस लाईव्स वव्र्व्हस बॉलीवूड वाईव्स सीझन-३ या शोमधून पदार्पण केले आहे. या शोच्या प्रमोशनवेळी अभिनेत्री आलिया भट्टने नणंदेवर प्रेमाचा वर्षाव केला आणि गॉसिप करण्यात ती रणवीरच्या पुढे असल्याचेही म्हटले आहे. आलियाने रिद्धिमाला राहाची सर्वात गमतीशीर आत्या असल्याचे म्हटले आहे. एका मुलाखतीत रिद्धिमाला आलियाकडून एक संदेश मिळाला होता. आलिया म्हणाली की, मला रिद्धिमाचा खूप अभिमान वाटतो आणि नेहमीच ती दमदार असते.
रिद्धिमा गॉसिप क्कीन होती आणि याबाबतीत तिचा भाऊ रणबीरच्याही पुढे आहे. जगातील खूप बातम्या तिच्याकडे आहेत, रिद्धिमा ही राहासाठी गाणे गाते. रिद्धिमा ही केवळ माझी नणंद नसून बहीण आहे. त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. आलियाच्या संदेशावर रिद्धिमा म्हणाली की, आलिया आणि रणबीरला त्यांची जागा देण्याचे निश्चित केले. आलिया कुटुंबासोबत जोडण्यासाठी खूप प्रयत्न करते. आमच्यात नैसर्गिक नाते आहे. आता दोघांच्या वक्तव्यांची जोरदार चर्चा रंगली असून, दोघांच्या नात्याचे सर्वांकडून कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे.