आलिया भट्टच्या 'जिगरा' चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले  youtube
मनोरंजन

Alia Bhatt Jigra Movie Trailer | आलिया भट्टचा चित्रपट 'जिगरा'चे जबरदस्त ट्रेलर भेटीला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - चित्रपट ‘जिगरा’चा जबरदस्त ट्रेलर भेटीला आला आहे. दीर्घकाळ प्रतीक्षेनंतर आज २६ सप्टेंबरला ट्रेलर रिलीज झाला. आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. शिवाय सोबत वेदांग रैनादेखील मुख्य भूमिकेत आहे. ट्रेलर ३ मिनिटांचा असून त्यातील काही सीन प्रेक्षकांना भावूक करमारे आहेत. प्रेक्षक ट्रेलरवर कॉमेंट करत असून कास्टींगचे कौतुक देखील करताना दिसत आहेत.

काय आहे 'जिगरा'च्या ट्रेलरमध्ये?

ट्रेलरच्या सुरुवातीला वेदांग रैना परदेशात दिसतो. त्याच्या एका चुकीमुळे तो तुरुंगात पोहोचतो. एका युजरने लिहिलं, ‘आलियाने आग लावली. हे काही तरी नवीन, अनोखे आहे. तू कमाल केलीस.’ आणखी एका युजरने लिहिलं, ‘जिगराचा ट्रेलर जबरदस्त आहे. आलिया भट्ट अभिनेत्री म्हणून कमालीची आहे.

दुसऱ्या युजरने कास्टिंगचे कौतुक करत सोशल मीडियावर लिहिलं, ‘ज्या कुणाला देखील वेदांग आणि आलियाला भाऊ-बहिणीच्या रूपात कास्ट करण्याची आयडिया आली. तो वास्तवात प्रमोशनचा हक्कदार आहे. दोघे बहिण-भाऊ म्हणून खूप सुंदर दिसत आहेत.

अशी आहे आलिया भट्टची भूमिका

आलिया भट्टने वेदांग रैनाच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. आपल्या भावाला तुरुंगात पाहून ती चिंतेत असते. त्याला सोडवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करते. ती जीवाची बाजी लावून अशी कारनामे करते की, पाहणाऱ्यांना अंगावर काटा येईल. ११ ऑक्टोबरला हा चित्रपट भेटीस येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT