आलिया भट्ट  instagram
मनोरंजन

Alia Bhatt | 'त्यावेळी' आलिया खूप रडली, ओरडली

'त्यावेळी' आलिया खूप रडली, ओरडली

पुढारी वृत्तसेवा

आलिया भट्ट हिने अल्पावधीतच कला जगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'गंगुबाई काठियावाडी' या सिनेमात तिने साकारलेल्या भूमिकेचे चाहते आणि समीक्षकांकडून खूपच कौतुक झाले. 'गंगुबाई काठियावाडी' या सिनेमामुळे आलियाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सोबत काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले; पण या सिनेमाच्या आधी आलियाला भन्साळी यांनी 'इन्शाल्लाह' या सिनेमाचीही ऑफर दिली होती. यामध्ये सलमान खान प्रमुख भूमिकेत झळकणार होता; पण त्यानंतर काही कारणाने हा सिनेमा बंद झाला. याचा आलियाला खूपच धक्का बसला होता, असा खुलासा भन्साळी यांनी आता केला आहे.

भन्साळी एका मुलाखतीत म्हणाले की, 'इन्शाल्लाह' सिनेमा बंद पडला, त्यामुळे आलियाला खूपच दुःख झाले होते. तिचे ब्रेकडाऊन झाले होते. ती खूप रडली, ओरडली, स्वतःला खोलीत बंदही करून घेतलं. मात्र, याच्या एक आठवड्यानंतरच मी तिला 'गंगुबाई काठियावाडी' सिनेमात लोड रोल ऑफर केला. तेव्हा आलिया गोंधळून गेली की, ती हे करू शकेल की नाही? मी तिला समजावलं आणि नंतर तिने गंगुबाईची भूमिका उत्तम साकारली. आलिया लवकरच भन्साळी यांच्या आगामी 'लव्ह अँड वॉर 'मध्येही झळकणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत रणबीर कपूरही असणार आहे. तसेच विकी कौशलही या सिनेमात असेल. या तिघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. २०२६ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT