‘धुरंधर’मधील नेगेटिव्ह भूमिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला अभिनेता अक्षय खन्ना आता दिग्दर्शक प्रशांत वर्माच्या आगामी चित्रपटात आणखी एका खतरनाक भूमिकेत दिसणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आपल्या प्रभावी अभिनयासाठी ओळखला जाणारा अक्षय पुन्हा एकदा प्रेक्षकांना थरारक अनुभव देणार आहे.
अनेकदा हिरो म्हणून चांगले चित्रपट दिल्यानंतरही अक्षयला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. किंबहुना, त्याला सुपरस्टार होता आले नाही. पण हमराजसारख्या चित्रपटात निगेटिव्ह भूमिका साकारून अभिनय सिद्ध करणारा अक्षय खन्नाच होता. इतक्या वर्षानंतर धुरंधरमध्ये त्याने जी आपली प्रतिमा निर्माण केलीय, त्यानंतर त्याला निगेटिव्ह भूमिकेत पाहणं, प्रेक्षकांना आवडत आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी आणि गंभीर अभिनय करणारा अभिनेता म्हणून ओळखला जाणारा अक्षय खन्ना सध्या आपल्या नेगेटिव्ह भूमिकांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ चित्रपटातील त्याच्या खलनायकाच्या भूमिकेला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. या यशानंतर आता अक्षयच्या हाती आणखी एक मोठा आणि खतरनाक रोल लागल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक प्रशांत वर्मा आपल्या आगामी चित्रपटासाठी अक्षय खन्नाला एका महत्त्वाच्या नेगेटिव्ह भूमिकेसाठी विचारात घेत आहेत. प्रशांत वर्मा हे त्यांच्या वेगळ्या मांडणीसाठी आणि दमदार कथा सांगण्याच्या शैलीसाठी ओळखले जातात. त्यामुळे या दोघांची ही जोडी प्रेक्षकांसाठी विशेष ठरण्याची शक्यता आहे.
हमराज असो वा छावा ... निगेटिव्ह भूमिकेत अक्षय खन्ना फिट बसला. विक्की कौशलचा चित्रपट छावामध्ये अक्षय खन्ना खलनायक औरंगजेबच्या भूमिकेत होता. या भूमिकेसाठी त्याचे खूप कौतुक देखील झाले होते. जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन आणि दमदार अभिनयामुळे अनेक लोक त्याला ओळखू शकले नाहीत. छावा नंतर धुरंधरमध्ये रहमान डकैतच्या भूमिकेत तो गाजतोय. सगळीकडे फक्त अक्षय खन्नाची चर्चा सुरु असताना तो तेलुगू चित्रपटात पदार्पण करत असल्याचं म्हटलं जात आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट हनुमानचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी त्यांच्या महाकाली चित्रपटात अक्षयला निगेटिव्ह भूमिका दिली आहे.
अक्षय खन्ना धुरंधरनंतर दृश्यम ३ मध्ये दिसणार होता. पण विगच्या प्रकरणावरून तो या चित्रपटातून बाहेर पडला. आता तो आगामी तेलुगू डेब्यू चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी होणार आहे. दिग्दर्शक पूजा कोल्लरूने नुकताच अक्षय खन्नासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, जो महाकाली चित्रपटाच्या सेटवरून सेल्फी घेतली आहे. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे.